Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

आदित्य बिर्ला सनलाइफ एएमसी लिमिटेड इनिशिएल पब्लिक ऑफर २९ सप्टेंबर रोजी खुली होणार

मुंबई: आदित्य बिर्ला सनलाइफ एएमसी लिमिटेड (”कंपनी”) ही क्रिसिल रिपोर्टनुसार क्यूएएयूमकडून ३१ मार्च २०१८ पासून भारतातील सर्वांत मोठी बिगर बँक जोडलेली एएमसी म्हणून दर्जा प्राप्त आहे आणि ती ३० सप्टेंबर २०११ पासून क्यूएएयूएमकडून चार सर्वांत मोठ्या एएमसीपैकी एक म्हणून गणण्यात आली आहे. ही कंपनी २९ सप्टेंबर २०२१ रोजी आपली इनिशियल पब्लिक ऑफरिंग (”ऑफर”) सुरू करण्याची योजना बनवत आहे.

ऑफरचा प्राइज बँड प्रति समभाग ६९५ रूपये ते ७१२ दरम्यान ठरवण्यात आला आहे. बिड लॉट २० समभाग आहे आणि त्यानंतर २० समभागांच्या प्रमाणात आहे.

या ऑफरमध्ये आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडच्या प्रत्येकी ५ रूपये दर्शनी मूल्याच्या ३८,८८०,००० समभागांचा (समभाग) समावेश विक्रीच्या ऑफरद्वारे आहे. विक्रीच्या ऑफरमध्ये आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्या (एबीसीएल) २,८५०,८८० समभागांचा आणि सनलाइफ (इंडिया) एएमसी इन्व्हेस्टमेंट आयएनसी.च्या ३६,०२९,१२० समभागांचा (सनलाइफ एएमसी आणि एबीसीएल एकत्रितरित्या ”विक्रेते समभागधारक”) समावेश आहे.

ऑफरमध्ये एबीसीएल समभागधारकांकडून सबस्क्रिप्शनसाठी १,९४४,००० समभागांसाठी आरक्षणाचा समावेश आहे (यानंतर विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे.) यानंतर एबीसीएल समभागधारकांच्या आरक्षणाचा भाग वगळता ऑफरला ”निव्वळ ऑफर” असे संबोधित केले आहे आणि त्याचे मूल्य ३६,९३६,००० समभागांपर्यंत वाढते. ऑफर आणि निव्वळ ऑफरमध्ये कंपनीचे पोस्ट ऑफर पेड अप समभाग भांडवलाच्या १३.५० टक्के आणि १२.८३ टक्के समाविष्ट असतील.

ही ऑफर दुरूस्ती केल्याप्रमाणे सिक्युरिटीज काँट्रॅक्ट्स (नियमन) नियम १९५७ च्या नियम १९ (२) (बी), सोबत वाचा दुरूस्ती केल्याप्रमाणे सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियमावली २०१८ (”सेबी आयसीडीआर नियमावली”)च्या संदर्भात केली जात आहे. ही ऑफर सेबी आयसीडीआर नियमावलीच्या नियम ६(१) नुसार एका बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे दिली जात आहे ज्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त नाही अशा नेट ऑफर या पात्र संस्थात्मक ग्राहकांसाठी प्रमाणशीर तत्वावर वितरणासाठी उपलब्ध असतील

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading