Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

टेलिव्हिजन या माध्यमात काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा आहे – तानाजी गालगुंडे

सैराट सारख्या यशस्वी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेला बाळ्या म्हणजेच अभिनेता तानाजी गालगुंडे आता मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. मन झालं बाजींद या मालिकेत तानाजी मुंज्याची व्यक्तिरेखा साकारतोय आणि ही व्यक्तिरेखा सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस पडतेय. तानाजी हा पहिल्यांदाच टेलिव्हिजन या माध्यमात काम करतोय.

त्याबद्दलचा अनुभव शेअर करताना तानाजी म्हणाला, “टेलिव्हिजन या माध्यमात काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा आहे. हे माध्यम मुळातच खूप फास्ट आहे. या माध्यमातून आपण खूप कमी वेळात जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. तसंच या माध्यमात काम पण खूप वेगवान असतं ते मला अंगवळणी पडताना थोडं कठीण जातंय पण मालिकेची टीम खूपच सपोर्टिव्ह आहे त्यामुळे ते मला सांभाळून घेतात. चित्रपटात काम करताना आपल्याकडे खूप वेळ असतो. महिनाभर आधी स्क्रिप्ट मिळते मग त्यावर चर्चा होते पण टेलिव्हिजन मध्ये तसं नसतं. इथे स्क्रिप्ट हातात आली कि लगेच सिन करायचा असतो. पण इथे सगळे मला सांभाळून घेत आहेत.” प्रेक्षकांना तानाजीची मुंज्या ही व्यक्तिरेखा खूप आवडतेय. या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल बोलताना तानाजी म्हणाला, “मुंज्या या माझ्या व्यक्तिरेखेसाठी प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मला मिळतोय. मुंज्याला पाहताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय. मुंज्याच्या कॅरेक्टरमध्ये असणारा निरागसपणा, त्याचा होणारा गोंधळ आणि त्याच्या रिऍक्शन्स पाहायला प्रेक्षकांना खूप आवडतंय.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading