Sunday, September 27, 2026
Latest NewsPUNE

माती, पंख आणि आकाश हे पुस्तक महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पाहोचावे -उदय सामंत

पुणे – मराठी तरुणांच्या जीवनाला आकार देणारे डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचे माती, पंख आणि आकाश हे पुस्तक महाराष्ट्रातील प्रत्येक महाविद्यालयात, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पाहोचले पाहिजे, तसेच डॉ. मुळे यांचा महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधला जावा या दृष्टीने प्रयत्न करू अशी ग्वाही, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारी केंद्रांची अवस्था डळमळीत झाली आहे. या केंद्रांच्या सुधारणेसाठी तसेच स्पर्धा परीक्षा देणार्या महाराष्ट्रातील मुलांना पुढे आणण्यासाठी डॉ. मुळे यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना त्यांच्या माती, पंख आणि आकाश या गुजतरातीतील अनुवादीत पुस्तकास गुजरात साहित्य अकादमीतर्फे 2018 या वर्षातील उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे. या निमित्त संवाद पुणे आणि समस्त पुणेकरांच्या वतीने त्यांचा  सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर होते.  डॉ. सदानंद मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. संवाद पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे,  सचिन ईटकर व्यासपीठावर होते.

सावंत पुढे म्हणाले, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शेतकर्यांची मुले प्रशासकीय सेवेत येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे हे पुस्तक महाराष्ट्रातील ग्रंथायलांमध्ये पोहोचविण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडल्यानंतर ते विधायक कार्याकडे वळतील, चांगल्या-वाईटाचे ज्ञान त्या विद्यार्थ्यांना होईल, असा आपल्याला विश्वास आहे. स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतायारीसाठी असलेल्या केंद्रांच्या सुधारणांबाबतचा अहवाल तयार असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितल्याचे सामंत म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना डॉ. ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, दिल्लीत महाराष्ट्र झळकला पाहिजे, ही आपली अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. यशासाठी शंभर पावले टाकण्याची प्रतिज्ञा केली जाते पण शंभरावे पाऊल टाकताना मराठी तरुण अडखळतो. यामुळेच मराठी माणूस मागे राहिला ही बोचरी जाणीव आहे. महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, ही आपली अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. राजकारण वाईट नाही, सगळ्या चांगल्या व्यक्तींनी राजकारणात जरूर यावे. समाजपरिवर्तन झाले पाहिजे, निवृत्ती ही प्रवृत्ती व्हावी आणि रिटायरमेंट ही रि-अटायरमेंट असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading