Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

गणेशोत्सव कार्यकर्ते म्हणजे ख-या अर्थाने समाजाचे नेतृत्व – पराग ठाकूर

अखिल मंडई मंडळ आणि माणुसकीचे दूत व्यासपीठ तर्फे गणेशोत्सवाशी संबंधित कलाकार व तंत्रज्ञ यांना धान्य वाटप
पुणे : समाज चालवण्याची जबाबदारी गणेशोत्सव कार्यकर्ते पार पाडत आहेत. मंडळाचे कार्यकर्ते हे समाजाच्या रक्तवाहिन्या आहेत. ख-या अर्थाने हे कार्यकर्ते समाजाचे नेतृत्व करत आहेत, असे मत ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्रचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी व्यक्त केले.

अखिल मंडई मंडळ आणि माणुसकीचे दूत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाशी संबंधित कलाकार व तंत्रज्ञ यांना धान्य वाटप करून धान्यरुपी प्रसाद देण्यात आला. यावेळी इस्कॉनचे विश्वस्त संजय भोसले, चंदुकाका सराफ अँड सन्सचे कुमार राठोड, अखिल मंडई मंडळाचे कोषाध्यक्ष संजय मते, सचिव विश्वास भोर, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, माणुसकीचे दूतचे अखिल झांजले, सारंग सराफ, हेमंत जाधव, नृपेश गायकवाड, आदित्य काकडे, साहिर शेख उपस्थित होते. 

संजय भोसले म्हणाले, भारत देशाची सेवा करण्याची  संस्कृती महान आहे. या महान देशाची परंपरा पुढे चालविण्याचे काम गणेश मंडळे करत आहेत. भारतीयांमधील सेवाभावी वृत्तीमुळेच कोरोना सारख्या मोठ्या संकटातून आपण बाहेर पडलो. गणेशोत्सव मंडळे हे सेवेचे भान जपत आहेत, असेही त्यांनी सांगितले. आनंद सराफ यांनी प्रास्ताविक केले. सूरज थोरात यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading