Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

रस्त्यांवरील खड्ड्यामध्ये वृक्षरोपण करून ‘गांधीगिरी’

पुणे: नवीपेठ, गांजवे चौक, शास्त्री रोड, सेनादत्त पेठ, अनंत कान्हेरे पथ ते पत्रकार भवनकडे जाणारा रस्ता आणि आसपासच्या परिसरातील रस्त्यावर वाढत चाललेले खड्डे प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खड्डयात वृक्षारोपन करून प्रतिकात्मक आंदोलन केले. पुढील काळात खड्डे बुजवण्याचे काम तत्काळ न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसचे पदाधिकारी व पीएमटीचे माजी अध्यक्ष सुधीर काळे यांनी दिला आहे. यावेळी स्थानिक महिला, जेष्ठ नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. सगळीकडेच खड्ड्यांची भरमार आहे. वाहन चालकांना हि खड्डे वाचवत आपली वाहन चालवणे म्हणजे जणू एक कसरतच करावी लागत आहे. हे खड्डे वाचविण्याच्या नादात वाहने एकमेकाला आदळून दुर्घटना होत आहेत. भर रस्त्यांमध्ये मोठे खड्डे निर्माण झालेले आहेत. या प्रश्नावर पुणे महानगर पालिकाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नाही का असे सवाल जनतेच्या मनात उठत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading