ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आयोगाला पत्र लिहिणार उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात इमपेरीकल डेटा देण्यास नकार दिला आहे. . त्यामुळे ओबीसी समाजामध्ये परत एकदा नाराजी पसरली आहे. त्यासंदर्भात माझी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली.यावर काही मार्ग निघू शकतो का यावर चर्चा झाली. ओबीसी आयोगाकडून अभ्यासपूर्ण माहिती मिळाली तर मार्ग निघू शकतो. यामुळे मुख्यमंत्री याबाबत ओबीसी आयोगाला पत्र लिहिणार आहेत.असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील आयोजित पत्रकार परिषदेत सांगितल.
कोंरोंना आढावा बैठकीनंतर अजित पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले , फडणवीस 100 अजित पवार खिशात घालतील या चंद्रकांत दादांच्या विधानावर मला काहीही बोलायचं नाही मी फक्त विकासावर बोलेन.आणि माध्यमांनीही कशाला अशा वादग्रस्त विधानांना विनाकारण प्रसिद्धी देऊ नये अशी माझी विनंती.
शक्ती कायदा करत असताना आमच्या महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत.या शिवाय त्याचा कुणाला त्रास होता कामा नये. आई वडिलांनी आपला मुलगा आणि मुलगी काय करते याकडे लक्ष दिले पाहिजे, 70 ते 75 टक्के जवळच्या लोकांकडून अशा घटना घडत असतात, त्यांना एवढं कडक शासन केलं पाहिजे ते बघितल्यावर कुणाच्या मनात तस करण्याची हिंमत झाली नाही पाहिजे. असेही अजित पवार म्हणाले
जरांडेश्वर कारखान्याचे कागदपत्र अजित पवारांनी जाहीर करावीत अस किरीट सोमय्यांनी पुण्यात जाहीर केलं होतं
कोणी माझं नाव घेत असेल तर त्याला मी काय करू त्यांनी पुण्यात येऊन माझं नाव घेऊ द्या किंवा काटेवाडीत येऊन घेऊ द्या.मला त्यावर काही म्हणायचं नाही. असे अजित पवार यांनी किरीट सोमय्याना प्रत्युत्तर दिले.
सकाळी एका कार्यक्रमात खासदार गिरीश बापट यांनी नितीन गडकरी यांच्या कडे अजित पवार यांचे जे फ्लेक्स शहरात लागतात ते काढा असे गिरीश बापट म्हणाले होते. त्या वर अजित पवार म्हणाले मी गिरीश बापट यांच्याशी सहमत आहे.फ्लेक्स मुळे शहरात बकाल पणा वाढतो त्या मुळे ते फ्लेक्स काढावे असे अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस राज्य शासनाकडून मान्यता मिळाली आहे.झोपडपट्टी पुनर्वसन चा प्रश्न हा सुटला आहे. पिंपरी चिंचवड व पुणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन होणार आहे.आहे.झोपडपट्टी पुनर्वसन चे अधिकारी राजेंद्र निबाळकर हे पुढील माहिती देतील असे त्यांनी सांगितले.
दरम्यान काल महानगरपालिकेच्या निवडणूकिमध्ये 3 सदय प्रभाग हा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्री मंडळाच्या हा निर्णय झाला.त्या वर विरोधी पक्ष नाराज झाले आहेत.मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे हे तर कोर्टा मध्ये या विरुद्ध जायला निघाले आहेत त्या वर अजित पवार म्हणाले आम्ही येत्या बुधवारी होणाऱ्या राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत या निर्णयावर परत विचार करणार आहोत.असेही पवार म्हणाले.
