Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

साहित्यात शृंगाररसा सोबतच विरह रसाला देखील अनन्यसाधारण महत्त्व- डाॅ.सदानंद मोरे

पुणेः- साहित्यात विविध रसांवर आधारीत विपूल साहित्य निर्मिती झालेली आढळून येते. कारण शृंगार रसा सोबतच विरह रसाला देखील साहित्यात अनन्य साधारण म्हत्त्व दिले आहे , असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृति महामंडळाचे अध्यक्ष डाॅ.सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृति महामंडळाचे अध्यक्ष डाॅ.सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

सिग्नेट पब्लिकेशन्स तर्फे प्रकाशित आणि लेखिका डाॅ. ज्योती रहाळकर लिखित मेघदूत… प्रतिसंदेश या नवीन काव्याचे प्रकाशन डाॅ. मोरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र राज्य विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डाॅ. राजा दीक्षित उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर सिग्नेट पब्लिकेशन्सचे अॅड. प्रमोद आडकर आणि डाॅ. जयेश रहाळकर उपस्थित होते.

यावेळी डाॅ.सदानंद मोरे म्हणाले, कालिदासाने निर्माण केलेल्या साहित्यीक संस्कृतीचा आपण हिस्सा आहोत आणि ज्या सांस्कृतिक साहित्यीक परंपरेचा आपण हिस्सा आहोत त्या परंपरेशी आपला संवाद असणे आवश्यक असते. त्या संवादा शिवाय आपण त्या परंपरेवर अधिकार सांगू शकत नाही. हा संवादाचा प्रघात आपणांस संत साहित्यात ही आढळतो. संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्या पातळी वरही हा संवाद आढळतो .

डाॅ. राजा दीक्षित म्हणाले, कालिदास यासारखे साहित्यीक आणि त्यांची साहित्य निर्मीती ही कालातीत असते. ती कधी जुनी किंवा कालबाह्य होतच नाही. प्रत्येक पिढीला त्याचा कालिदास निर्मित साहित्याचा अभ्यास करतांना त्याच्या अनुभवावर आधारीत नवनवीन अर्थ लागत असतो. प्रत्येक संवेदनशील आणि साहित्यीक मनाला कालिदासांच्या साहित्याचा अभ्यास करावासा वाटतो आणि त्यावर साहित्यीक मार्गाने व्यक्त ही व्हावसे वाटते. कुसुमाग्रज, शांता शेळके, वसंतराव पटवर्धन, नानासाहेब गोरे, शरद काळे अशी कितीतरी नावे सांगता येतील त्यांनी कालिदासांच्या साहित्याचा अभ्यास करुन त्यावर भाष्य किंवा अनुवाद केलेला आहे. कालिदासांनी मेघदूताच्या माध्यमातून संपूर्ण साहित्यविश्वच समृद्ध केले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अरुजा रहाळकर यांनी केले तर जयेश रहाळकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading