एचडीएफसी म्युच्युअल फंडा तर्फे एचडीएफसी डेव्हलप्ड वर्ल्ड इंडेक्सेस फंड ऑफ फंड्स सादर  

पुणे : व्यवस्थापनांतर्गत मालमत्तेमध्ये ४.३७ ट्रिलीयन रुपये असलेल्या आणि भारतातील आघाडीच्या म्युच्युअल फंड हाऊसपैकी एक असलेल्या एचडीएफसी म्युच्युअल फंडच्या योजनांचे गुंतवणूक व्यवस्थापक असणाऱ्या एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने आपली पहिली आंतरराष्ट्रीय योजना- एचडीएफसी डेव्हलप्ड वर्ल्ड इंडेक्सेस फंड ऑफ फंड्स सादर करत असल्याची घोषणा केली आहे. अशा प्रकारची ही पहिलीच योजना असून २३ विकसीत बाजारपेठीय देशांमध्ये ५ विभागांमध्ये, १५०० हून अधिक घटकांमध्ये आणि जागतिक जीडीपीच्या ५६ टक्के कव्हरेज सह १४ चलनात आणि एकाच सिंगल फंडामध्ये वर्ल्ड मार्केट कॅपच्या ५० टक्के ही योजना सादर होणार आहे.

ज्यांना गुंतवणुकीत विविधता आणायची आहे आणि विकसीत जगातील संधींचा लाभ उठवायचा आहे त्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड योग्य ठरेल. ५१० अब्ज अमेरिकी डॉलर व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता असलेले जगातील आघाडीचे जागतिक मालमत्ता व्यवस्थापक असलेल्या क्रेडीट सुस अॅसेट मॅनेजमेंटच्या साथीत हा फंड सादर होत आहे. फंड क्रेडीट सुस इंडेक्स फंडात आणि/किंवा ईटीएफ मध्ये गुंतवणूक करेल जो एमएससीआय वर्ल्ड इंडेक्सच्या कामगिरीचे मुल्यांकन करेल. नवीन फंड योजना १७ सप्टेंबर २०२१ पासून खुली होत असून १ ऑक्टोबर २०२१ रोजी बंद होईल. युनिट्स चे वाटप झालेल्या तारखेपासून ५ कार्यकालीन दिवसांत फंड पुन्हा विक्री आणि पुन्हा खरेदीसाठी खुला होईल.

या फंडाबद्दल बोलताना एचडीएफसी एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नवनीत मुनोत म्हणाले, एचडीएफसी डेव्हलप्ड वर्ल्ड इंडेक्सेस फंड ऑफ फंड्स सादर करत असताना आम्हांला खूप आनंद होत आहे. अशा प्रकारची ही पहिलीच योजना आहे. हा फंड म्हणजे गुंतवणूकदारांना विकसीत जगात जाण्यासाठीचा महामार्ग आहे. विविध देश, वेगवेगळी चलने, विविध क्षेत्र, शैली आणि आकार अशा सगळ्या गोष्टींमध्ये आणि जोडीला जागतिक कररचना आणि अंमलबजावणी यांच्या दृष्टीकोनातून शक्य ती सर्वोत्तम विविधता आणण्याची क्षमता या एका फंडात आहे. भारतीय बाजाराचे विकसीत बाजारांशी कमी परस्परसंबंध असताना या फंडामुळे निरोगी, मजबूत पोर्टफोलिओ वैविध्य जपणे शक्य होऊ शकेल.

 

Leave a Reply

%d bloggers like this: