देशात कोरोना लसीकरणाचा नवा जागतिक विक्रम, एकाच दिवसात एक कोटीहून अधिक नागरिकांना डोस

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरण वेगाने सुरू आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली. हा एक नवा जागतिक विक्रम आहे. नुकतेच पीआयबी ने आपल्या ट्विटवर अकाऊंट वरून ही माहिती दिली आहे.या करोना लसीकरणाच्या कार्यक्रमांतर्गत देशात आतापर्यंत चार वेळा 1 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.

यापूर्वी देशात करोना लसीकरणाचे झालेले विक्रम खालील प्रमाणे 

17 सप्टेंबर (दुपारी तीन वाजेपर्यंत) – दीड कोटी नागरिकांचे लसीकरण

6  सप्टेंबर – 1.13 कोटी नागरिकांचे लसीकरण

27 ऑगस्ट – 1.03 कोटी नागरिकांचे लसीकरण

31 ऑगस्ट – 1.33 कोटी नागरिकांचे लसीकरण

 

Leave a Reply

%d bloggers like this: