सोनू सूद आयकर विभागाच्या रडारवर? मुंबईच्या कार्यालयात पाहणी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घरावर बुधवारी आयकर विभागाने ‘सर्व्हे’ केला आहे. त्यामुळे सोनू सूद आयकर विभागाच्या रडारवर असल्याची जोरदार चर्चा आहे. सोनू सूदने अलिकडेच दिल्लीतील आप सरकारच्या एका उपक्रमामध्ये ब्रँड अम्बासिडर होण्याची जबाबदारी उचलली आहे. त्यानंतर काही दिवसांनी सोनू सूदच्या घराचा आयकर विभागाने ‘सर्व्हे’ केला.

सोनू सूद अलीकडेच दिल्ली सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘देश के मेंटर’ कार्यक्रमाचा ब्रँड अॅम्बेसेडर बनला आहे. सोनू सूद ट्विटर, फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना मदत करत आहे. कोरोनाच्या काळात सोनू सूदने ज्या प्रकारे मजुरांना मदत केली, त्याने सर्वांचे मन जिंकले आहे. आजही तो कुणालाही मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतो.

अभिनेता सोनू सूदने नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. यानंतर दोघांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, आज सोनू सूद संपूर्ण देशासाठी प्रेरणा बनला आहे. प्रत्येकजण जो त्याच्या घरी मदत मागण्यासाठी येतो, सोनू सूद त्याला मदत करतो. आज अशी अनेक सरकारं आहेत, जी काही करू शकत नाहीत, ते सोनू सूद करतो आहेत. आम्ही दिल्ली सरकारद्वारा काही खास उपक्रमांबद्दल सोनू सूदशी बोललो आहोत .यानंतर, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब निवडणुकीत प्रचाराबाबतच्या सर्व अटकळांना पूर्णविराम दिला.

केजरीवाल पुढं म्हणाले की, दिल्लीमध्ये आम्ही ‘देश के मेंटर’ कार्यक्रम सुरू करणार आहोत. सोनू सूद देशाच्या मार्गदर्शक कार्यक्रमाचा ब्रँड अॅम्बेसेडर असेल.शिक्षण हा एक मोठा प्रश्न आहे!यानंतर सोनू सूद म्हणाला की, लॉकडाऊननंतर जेव्हा आम्ही अनेक लोकांशी संपर्क साधला, तेव्हा कळलं की शिक्षण ही एक मोठी समस्या आहे. पण या दरम्यान मोठे प्रश्न असे आहेत की मुलांना पुढं काय करावं हे माहित नाही. कुटुंबात सांगायला कोणी नाही. तुम्ही मुलांना शिक्षण द्याल, पण त्यांना योग्य दिशा देणारा कोणीतरी असावा. तर या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न असेल.

Leave a Reply

%d bloggers like this: