महिंद्रा तर्फे एलसीव्ही ट्रक्सची फ्युरीओ ७ ही नवी मालिका सादर

मुंबई : महिंद्रा समूहाचा एक भाग असणाऱ्या महिंद्रा ट्रक आणि बस विभागाने पाच वर्षानंतर आज त्यांच्या अत्याधुनिक, लाईट कमर्शियल व्हेईकल्स (हलकी व्यावसायिक वाहने -एलसीव्ही)ची महिंद्रा फ्युरीओ ७ ही नवी, आधुनिक मालिका ‘अधिक मायलेज किंवा ट्रक परत’ आणि ‘फेरविक्रीला खात्रीशीर मूल्य’ अशा अभूतपूर्व दुहेरी हमीसह सादर केल्याचे जाहीर केले.

महिंद्रा ट्रक आणि बस विभाग हा २०१९ मध्ये सादर केलेला सध्या सुरु असणारा फ्युरीओ हा मध्यवर्ती व्यावसायिक वाहन ब्रँड महिंद्रा फ्युरीओ ७ या संपूर्णपणे नवीन हलक्या यावसायिक वाहन मालिकेच्या रुपात सादर करत आहे. ही मालिका ४-टायर कार्गो, ६ टायर कार्गो एचडी आणि ६ टायर टिपर अशा तीन प्रकारच्या उत्पादन प्रकारांत उपलब्ध होईल. हलक्या वजनाच्या व्यावसायिक वाहन विभागांतील व्यावसायिक गरज या मालिकेतून पूर्ण होईल. सर्वोत्तम मायलेजसह उच्च नफा, हायर पेलोड आणि बेंचमार्क केबिन यामुळे जास्तीत जास्त आराम, सोय आणि सुरक्षितता फ्युरीओ ब्रँडमधून मिळत आहे. यामधून सर्वाधिक अत्याधुनिक टेलीमॅटिक्स तंत्रज्ञान: महिंद्रा आयमॅक्सलाही चालना मिळत आहे.

महिंद्रा फ्युरीओ ७ लाईट कमर्शियल व्हेईकल मालिका ही फ्युरीओ आयएल सीव्ही उत्पादन मालिका विकासाचा एक भाग आहे. गेल्या सहा वर्षांहून अधिक काळापासून महिंद्राचे ५०० हून अधिक अभियंते आणि १८० पुरवठादार यांच्या अथक प्रयत्नांतून तसेच ६५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून हे साकार झाले आहे. महिंद्रा ट्रक आणि बसच्या ‘मायलेज हमी’ देणाऱ्या अत्यंत यशस्वी आणि लोकप्रिय अशा ब्लाझो एक्स या जड व्यावसायिक वाहन मालिकेच्या सादरीकरणानंतर फ्युरीओ मालिका सादर होत आहे. ब्लाझो एक्सने जड व्यावसायिक वाहन विभागात सर्वाधिक इंधन सक्षम ट्रक म्हणून स्वतःला प्रस्थापित केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: