Pune – गेल्या 24 तासात 199 नवीन कोरोनाचे रुग्ण तर 225 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी असून दीडशे च्या वर आज रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 199नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 225रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 98हजार 667इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 87हजार 823इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 8रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 3तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 5रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8986जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 1858रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 188रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 7973
स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
