देणे समाजाचे – एक सदभावना महोत्सव 24 सप्टेंबर पासून

पुणे: देणे समाजाचे या अनोख्या सामाजिक उपक्रमाचे हे सतरावे वर्षे आहे.या निमित्ताने हे प्रदर्शन 24 ते 26 सप्टेंबर दरम्यान पुण्यामध्ये कर्वे रोड, कासाट पंपाशेजारी हर्षद हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनात निमसरकारी व सेवाभावी काम करणाऱ्या सुमारे पंधरा संस्था आपल्या कार्याची माहिती लोकांसमोर मांडणार आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवार 24 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता ज्येष्ठ समाजसेवक डॉ अनिल अवचट यांच्या हस्ते होणार आहे. हरिष बैजल आयपीएस सायबर महाराष्ट्र, हे प्रमुख पाहुणे तर अभिनेता आरोह वेलणकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत आटीटी सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष विणा गोखले यांनी माहिती दिली.

या पत्रकार परिषदेला प्रकाश बोकील, नरेंद्र म्हसवडे उपस्थित होते.
विणा गोखले म्हणाल्या, मागच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे हे प्रदूषण ऑनलाइन भरवण्यात आले होते. गेल्या दोन वर्षात जोडी दिसते वाजता सर्वसामान्य माणसाची झालीआहे .त्यापेक्षा काहीतरी जास्त बिकट अवस्था त्या सामाजिक संस्थांची झाले आहे .त्यांना मिळणाऱ्या भेट देणाऱ्या लोकांची शाळा बंद झालेला आहे संस्थांच्या पाठीशी उभे राहणे त्यांना आर्थिक बळ देणे त्यांचे इतर गरजा पुरविणे या भावनेतून यावर्षी कोरोना चे सर्व सावट असतानाही सर्व प्रकारची खबरदारी घेऊन या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. गेल्या सोळा वर्षात दोनशे सेवाभावी संस्था या उपक्रमाच्या माध्यमातून समाजासमोर आहे आणि किमान आठ कोटी रुपयांचा निधी सेवाभावी संस्था मिळाला समाज बांधव होणार या उपक्रमाचा सगळा खर्च भागवला जातो.

Leave a Reply

%d bloggers like this: