उच्च शिक्षणामध्ये जातीवर आधारित भेदभावास प्रतिबंध करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विद्यापीठांना सूचना

औरंगाबाद : उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती,अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना कोणताही अधिकारी,प्राध्यापक, विविध प्राधिकरणावरील सदस्य,शिक्षकेतर कर्मचारी जातीवरून भेदभावाची वागणूक देत असेल तर त्याबाबत कठोर कारवाई करणेसाठी समिती गठीत करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ह्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ने परिपत्रक काढले आहे.

अनुसूचित जाती/जमातीच्या विद्यार्थ्यांकडून जातिभेदाच्या अशा तक्रारी नोंदवण्यासाठी विद्यापीठ/संस्था/महाविद्यालय त्यांच्या वेबसाइटवर एक पृष्ठ विकसित करू शकते आणि या हेतूने निबंधक/प्राचार्य कार्यालयात तक्रार नोंदवही ठेवू शकते. अशी कोणतीही घटना अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यास, चुकीचे अधिकारी/प्राध्यापक सदस्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी. विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की कोणतेही अधिकारी/प्राध्यापक सदस्य कोणत्याही समुदायाशी किंवा विद्यार्थ्यांच्या श्रेणीशी कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणार नाहीत.

एससी/एसटी/ओबीसी विद्यार्थी/शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या भेदभावाच्या तक्रारींची तपासणी करण्यासाठी विद्यापीठ एक समिती स्थापन करू शकते. जातीवरून भेदभावाच्या घटनांना सामोरे जाताना आपल्या विद्यापीठ/संस्थेच्या अधिकारी/प्राध्यापक सदस्यांना अधिक संवेदनशील राहण्याच्या सूचना यात करण्यात आल्या आहेत. विद्यपीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रो.रजनीश जैन ह्यांच्या सहीने पत्र देशातील सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठवले आहे.

दरम्यान, रिपब्लिकन विद्यार्थी सनेच्या वतीने  या प्रकारांकडे लक्ष वेढण्यात आले होते. Ph.D च्या RRC मुलाखतीसाठी नुकत्याच पात्र उमेदवारांच्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या सदरील याद्यांमध्ये Open,SC,ST, OBC,VJNT अश्या प्रवर्गांचा उल्लेख करून याद्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या शिवाय वेगवेगळ्या प्रवर्गासाठी तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या ह्यावर आक्षेप घेत केल्याने मुलाखत घेणाऱ्या तज्ञ ह्यांना मुलाखती पूर्वीच संशोधक विद्यार्थ्यांची जात व प्रवर्ग माहीत पडल्यामुळे त्याला गुण देतांना भेदभाव होण्याची दाट शक्यता होती. 


ह्या पूर्वी जातीय द्वेषातून संशोधक विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत तरी मौखिक परीक्षेसाठी जातीवर/प्रवर्गानुसार आधारित जाहीर केलेल्या याद्या तातडीने रद्द करून नोंदणी क्रमांकानुसार याद्या प्रकाशित कराव्या अशी मागणी करण्यात आली.
कुलगुरू डॉ.प्रमोद येवले ह्यांनी तात्काळ प्र. कुलगुरू ह्यांची कानउघडणी करत सदरील याद्या रद्द करून नव्याने याद्या लावण्यात यावा वरील प्रक्रियेत लागणाऱ्या वेळेनुसार मुलाखती पुढे ढकलण्यात याव्या असे आदेश दिले. ह्यावेळी डॉ.किशोर वाघ,सचिन निकम,गुणरत्न सोनवणे,अतुल कांबळे, प्रथम कांबळे,लोकेश कांबळे, सत्यजित म्हस्के आदी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: