शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाचे शुटिंग पुण्यात

पुणे: बॉलीवुडचा किंग खान, शाहरुख खान त्याचा आगामी चित्रपटच्या चित्रीकरणासाठी नुकताच पुण्यात दाखल झाला होता. संत तुकाराम मेट्रो स्टेशन येथे हे चित्रीकरण करण्यात आले. यावेळी शाहरुख खान, नयनतारा कुरियन, सुनील ग्रोव्हर आणि दिग्दर्शक अटली कुमार सारख्या स्टार्सने शहर गजबजले होते. असे म्हणावयास हरकत नाही.

याबद्दल माहिती देताना सन डे फिल्म्स पुणे चे लाइन प्रोड्यूसर इम्रान शेख म्हणाले “या प्रकल्पामध्ये ५०० कनिष्ठ कलाकार, ट्रान्सपोर्ट, स्पॉट बॉय, सुरक्षा आणि बाउंसर, हॉटेल्स, पुणे मेट्रो, पोलीस संरक्षण, खानपान, यांचा समावेश असलेल्या अंदाजे ५०० लोकांचा हा क्रू आहे. या चित्रीकरणामुळे ड्रोन कॅमेरा, एसटी स्टँड, फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर, जनरेटर, व्हॅनिटी व्हॅन, सफाई कर्मचारी, डेकोरेटर आणि पुण्यातील इतर विभागांना कमावण्याची संधी मिळाली अन्यथा, साथीच्या आजारामुळे बरेचसे लोक कामासाठी अजुनही संघर्ष करत आहेत.

ते पुढे म्हणाले.”पुणे हे अतिशय चांगले हवामान असलेले, ऐतिहासिक ठिकाणांनी समृद्ध, लोकांचे स्वागत करणारे एक सुंदर शहर आहे, त्यामुळे आम्हाला येथे कामाची भूक आहे व आम्ही येथे शूटिंगची व्याप्ती वाढवू शकतो,” आम्हाला संधी दिल्याबद्दल आणि सन डे फिल्म्सवर विश्वास ठेवल्याबद्दल आम्ही रेड चिलीज एंटरटेनमेंटचे कार्यकारी निर्माते धरम सोनी यांचे खूप आभारी आहोत. या चित्रपटाची निर्मिती गौरी खान (रेड चिलीज एंटरटेनमेंट) करत आहे.

पीसीएमसी पोलीस आयुक्त कृष्णा प्रकाश, पीसीएमसी आयुक्त राजेश पाटील, पीसीएमसीचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पुणे मेट्रोचे जी.एम – हेमंत सोनवणे यांनी या प्रकल्पाच्या चित्रीकरणादरम्यान दिलेल्या पाठिंब्या बद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.

आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की शूटिंगसाठी शासकीय परिसरात परवानगी द्या. अशा प्रकारच्या शूटसाठी एक खिडकी मंजुरी दिल्याने महाराष्ट्राच्या शासकीय परिसरांसाठी मोठी मदत होईल. यामुळे आम्ही निश्चितपणे काम घेऊ शकतो, आमचे काम व शुटींग करू शकतो. याचबरोबर यामुळे आपल्या देशातील इतर नागरिकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील.

Leave a Reply

%d bloggers like this: