नोकिया सी सीरीजमधील सर्वात किफायतशीर, एंट्री-लेव्हल स्मार्टफोन भारतात दाखल होतोय

नोकिया फोन्स बनवणाऱ्या एचएमडी ग्लोबल कंपनीने लोकप्रिय नोकिया सी सीरिज स्मार्टफोन्समध्ये ‘नोकिया सी०१ प्लस’ हा नवा फोन भारतात रिलायन्स रिटेल लिमिटेडसोबत धोरणात्मक भागीदारीसह सादर केला आहे.

अतिशय सुस्पष्ट ५.४५ एचडी+ स्क्रीन, १.६ गिगाहर्ट्झ ऑक्टाकोअर प्रोसेसर, फ्लॅशसह ५एमपी एचडीआर रियर आणि २एमपी फ्रंट फेसिंग कॅमेरे, संपूर्ण दिवसभर साथ देईल असे बॅटरी लाईफ, सर्वात नवीन अँड्रॉइड™ ११ ऑपरेटिंग सिस्टिम (गो एडिशन) आणि २ वर्षे त्रैमासिक सिक्युरिटी अपडेट्स या वैशिष्ट्यांसह नोकिया सी०१ प्लस त्याच्या किमतीचे सर्वोत्तम मूल्य प्रदान करतो. नोकिया स्मार्टफोन्सची खात्रीशीर गुणवत्ता आणि टिकाऊ क्षमता या फोनसोबत मिळतेच, याशिवाय फेस अनलॉकसारखी प्रायव्हसी सुरक्षित ठेवणारी वैशिष्ट्ये यामध्ये आहेत, या फोनसोबत १ वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी** दिली जाते.

नोकिया सी०१ प्लसच्या सुस्पष्ट ५.४५ एचडी+ स्क्रीनवर तुम्ही तुमच्या आवडीच्या कार्यक्रमांचा आणि युट्युब व्हिडिओंचा परिपूर्ण अनुभव घेऊ शकता.  फ्लॅशची सुविधा असलेले ५एमपी एचडीआर रियर आणि २एमपी फ्रंट फेसिंग कॅमेरे वापरून तुम्ही छान फोटो काढू शकता, मित्रमंडळी, नातेवाईकांना किंवा कामासाठी व्हिडिओ कॉल करू शकता.  दोन्ही बाजूला फ्लॅश असल्याने दिवस असो वा रात्र तुम्हाला हव्या असलेल्या प्रत्येक क्षणाचा स्पष्ट फोटो टिपता येतो.  एचडीआर इमेजिंग क्षमतेमुळे तुम्ही या फोनच्या साहाय्याने साठवलेल्या आठवणी प्रत्यक्ष क्षणांइतक्याच छान बनतील आणि सदैव आनंद देत राहतील.  काढता येण्याजोगी ३००० एमएएच बॅटरी असलेला नोकिया सी०१ प्लस संपूर्ण दिवसभर चालतो, घरी, कामावर किंवा बाहेर कुठेही, जराही व्यत्यय न येता तुम्ही हा फोन वापरत राहू शकता.

विश्वसनीय युरोपियन मानके

बांधणीचा दर्जा ते सुरक्षा स्तरांपर्यंत या डिव्हाईसमध्ये युरोपियन मानके सर्वत्र दिसून येतात.  नोकिया सी०१ प्लसवर अनेक वेगवेगळी परीक्षणे करण्यात आली आहेत, मुरगळण्यापासून वाकवण्यापर्यंत आणि तापवणे, जोर लावणे, खाली पाडणे अशी सर्व परीक्षणे या फोनवर करण्यात आली असून या फोनचा दर्जा व टिकाऊ क्षमता सुनिश्चित करण्यात आली आहे.  अतिशय मजबूत पॉलिकार्बोनेट बॉडी असून त्याच्या आत इनर मेटल अलॉय चेसिस आहे.

सायबर धोक्यांच्या बाबतीत देखील नोकिया सी०१ प्लस त्याच्या किमतीच्या श्रेणीतील इतर बहुतांश फोन्सच्या तुलनेत तुमचा डेटा जास्त सुरक्षित ठेवतो.  नियमितपणे सिक्युरिटी अपडेट्स कमीत कमी दोन वर्षे येत राहतील, फेस अनलॉकची सुविधा असल्याने तुमच्या आठवणी आणि महत्त्वाचा डेटा हे सर्व नीट सुरक्षित राहील.

वेगवान

अँड्रॉइड ११TM (गो एडिशन) सह नोकिया सी०१ प्लसवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेऊ शकता, हा तुमचा डेटाचा वापर ६०% नी कमी करण्यात मदत करतो, ऍप्स २०% अधिक वेगाने सुरु करतो आणि तुम्हाला अँड्रॉइड १० (गो एडिशन) पेक्षा ९०० एमबी अतिरिक्त स्टोरेज मिळते.  दोन वर्षांपर्यंत त्रैमासिक सिक्युरिटी अपडेट्स मिळत राहतात, त्यामुळे तुमचा डेटा सुरक्षित राहतो आणि फेस अनलॉक असल्याने फोनची सुरक्षा वाढते तसेच तो फ्युचर-प्रूफ राहतो.

Leave a Reply

%d bloggers like this: