Pune – गेल्या 24 तासात 178 नवीन कोरोनाचे रुग्ण तर 194 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी असून दीडशे च्या वर आज  रुग्ण सापडले  आहेत. पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 178नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 194रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 98हजार 468 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 87हजार 598इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 6रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 4तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 2रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8983जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 1887रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 191रुग्ण गंभीर आहेत, आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 6050
स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: