काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेनेनं ॲमेनिटी स्पेसच्या जागा लाटल्या -चंद्रकांत पाटील

पुणे : महानगरपालिकेत जो ‘ॲमेनिटी स्पेस’चा वाद चालला आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले, महाविकास आघाडीतील तीनही पक्ष पॅनिक झाले आहेत . काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेनेनंच ॲमेनिटी स्पेसच्या जागा लाटल्या आहेत, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी  महाविकास आघाडीवर केला.  पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी, प्रवीण दरेकर यांनी काल एका जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरून आक्षेपार्ह विधान केले होते.  त्या विधाना वरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रवीण दरेकर यांची पाठराखण केली आहे . प्रवीण दरेकर यांच्या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादीने पण जोरदार टीका केली होती. त्यावर पाटील यांनी भाष्य केले. राष्ट्रवादीच्या टीकेला दोन-तीन दिवसात सविस्तर उत्तर देणार असे ते म्हणाले. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ शकतात, असा सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे. त्यावर पाटील म्हणाले, एकूण जागांपैकी 25% जागा ओबीसींसाठी सर्वपक्षीयांनी राखीव ठेवाव्यात .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फक्त मातोश्रीवरून बोलतात ते जनतेसमोर कधीच येत नाही. कारभार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना वारकऱ्यांचे दुःख काय समजणार? असा टोला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. शक्ती कायद्याला सर्वपक्षीयांनी समर्थन द्यायला पाहिजे असेही ते म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: