ओबीसी समाजाचा  विश्वास घात करणाऱ्या आघाडी सरकार विरोधात भाजपा तर्फे उद्या राज्यभर आंदोलन

पुणे: ओबीसी समाजाचा  विश्वास घात करून ओबीसी आरक्षण घालविण्याया सरकार विरोधात भाजप उद्या राज्यभर आंदोलन करणार असल्याची घोषणा पुण्यातील पत्रकार परिषदेत पुणे शहर ओबीसी आघाडी अध्यक्ष योगेश पिंगळे यांनी केली. या पत्रकार परिषदेला प्रल्हाद सायकर भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष,गणेश कळमकर, शंतनू नारके उपस्थित होते.

योगेश पिंगळे म्हणाले ,भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष व प्रदेश पदाधिकारी निवडणूक आयोगाने काल धुळे, नंदुरबार, वाशिम, अकोला व नागपुर येथील जिल्हा परिषदेच्या ओबीसी आरक्षणा शिवाय पोटनिवडणूका जाहिर केल्या. राज्यातील महाविकास आघाडीच्या ओबीसी विरोधी धोरनामुळे व नाकर्तेपनामुळेच आज ही आपल्या ओबीसी समाजावर वेळ आलेली आहे. या आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक मंडळ स्तरावर मोठ्या संख्येत निषेधाचे फलक घेऊन हे आंदोलन यशस्वी करावे .
असे आवाहन पुणे शहर ओबीसी आघाडी अध्यक्ष योगेश पिंगळे यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: