Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

एनआयआरएफ रँकिंगमध्ये
भारती विद्यापीठ आयएमईडीला ६९ वे मानांकन

पुणे : भारती अभिमत विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आय.एम.ई.डी.) ला ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क’(एन.आय.आर.एफ) सर्वेक्षणात ७५ मॅनेजमेंट संस्थांच्या क्रमवारीत देशात ६९ व्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे.भारती अभिमत विद्यापीठाला राष्ट्रीय सर्वेक्षणाच्या विद्यापीठ क्रमवारीत ६८ वे मानांकन मिळाले आहे. या क्रमवारीत पुण्यातील केवळ २ मॅनेजमेंट कॉलेज असून राज्यातील केवळ ९ मॅनेजमेंट कॉलेजेसना स्थान मिळाले आहे.
‘संस्थापक स्व.डॉ.पतंगराव कदम, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ.विश्वजित कदम ,कुलगुरू डॉ .माणिकराव साळुंखे यांच्या
यांच्या पाठिंब्यामुळे व त्यांच्या प्रोत्साहनामुळे भारती विद्यापीठाने हे यश मिळविले आहे. उच्चशिक्षणाला पोषक वातावरण, उत्तम शिक्षणपद्धती, उत्तम शिक्षकवर्ग व विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळेच आयएमईडीला व्यवस्थापनाच्या शिक्षणक्षेत्रात मोठे योगदान देणे शक्य झाले आहे.’ अशी प्रतिक्रिया डॉ. सचिन वेर्णेकर यांनी व्यक्त व्यक्त केली.भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ . शिवाजीराव कदम ,सचिव डॉ. विश्वजित कदम ,कुलगुरू डॉ .माणिकराव साळुंखे यांनी आय.एम.ई.डी. आणि सर्व इन्स्टिट्यूटचे अभिनंदन
केले .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading