Wednesday, November 18, 2026
BusinessLatest News

पियाजिओ इंडियाकडून गणेशोत्सवाच्या निमित्ताने वेस्‍पा किंवा अॅप्रिलिया जिंकण्यासाठी “इन्शुरन्स ऑफर”सोबत “स्पिन दि व्हील” ऑफर

पुणे : गणेश चतुर्थीला भारतातील आणि जगभरातील अनेक लोकांच्या मनात खूप महत्त्वाचे स्थान आहे. गणेश चतुर्थीच्या उत्सवाला यावर्षी अधिक खास करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पियाजिओ वेइकल्स प्रा. लि. या इटालियन पियाजिओ ग्रुपच्या १०० टक्के मालकीच्या आणि प्रतिष्ठित वेस्‍पा आणि अॅप्रिलिया या दुचाकी गाड्यांच्या उत्पादक कंपनीने “स्पिन दि व्हील कॅम्पेन”सोबत “इन्शुरन्स ऑफर”च्या लाँचची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांच्या ग्राहकांना इन्शुरन्स ऑफरसोबत आकर्षक पारितोषिके जिंकता येतील आणि हा पवित्र सण वेस्‍पा आणि अॅप्रिलियासोबत अविस्मरणीय बनवता येईल.

पियाजिओचे उद्दिष्ट हा सणांचा कालावधी इन्शुरन्स ऑफर आणि बंपर पारितोषिके जसे अॅप्रिलिया/ वेस्‍पा स्कूटर्स, ब्रँडेड जाकिटे, हेल्मेट किंवा मोफत एएमसी देऊन साजरा करण्याचे आहे. त्यामुळे त्यांच्या ग्राहकांना जास्तीत-जास्त फायदे मिळतील आणि त्यांच्यामध्ये सणांचा उत्साह निर्माण होईल. ग्राहक वेस्‍पा किंवा अॅप्रिलियाचे सोशल मीडिया हँडल्स किंवा त्यांच्या अधिकृत वेबसाइट/ इ वाणिज्य पोर्टलवर जाऊ शकतात किंवा वेस्‍पा/ अॅप्रिलिया डीलरशिप्समध्ये जाऊ शकतात. तिथे या मोहिमेचा भाग होऊन ही आकर्षक पारितोषिके एका बटणाच्या क्लिकवर मिळवू शकतात. ग्राहक महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील (अहमदाबाद, बडोदा, बिलिमोरा, सुरत) वेस्‍पा/ अॅप्रिलिया डीलरशिपमध्ये वेस्‍पा किंवा अॅप्रिलिया ब्रँडच्या लाइफस्टाइल स्कूटर्स खरेदी करताना कूपन दाखवून बक्षिसे जिंकू शकतात. पियाजिओ इंडियाची ही आकर्षक मोहीम २५ सप्टेंबर २०२१ पर्यंत सुरू आहे.

Leave a Reply