Wednesday, November 18, 2026
Latest NewsLIFESTYLE

अब्दुल रेहमान आणि शानिया मायकेल ने जिंकला जयहिंद मिस्टर आणि मिस पुणे २०२१ चा किताब

पुणे: या वर्षीची बहुप्रतिक्षित स्पर्धा “जयहिंद मिस्टर आणि मिस पुणेचा भव्य ग्रॅंड फिनाले नुकताच पुण्यातील प्राइड हॉटेल येथे पार पडला, या स्पर्धेला पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. याचवेळी मिस्टर व मिस पुणेला २५ वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने केक कापुन सेलिब्रेशन करण्यात आले. जयहिंद मिस्टर अँड मिस पुणे २०२१ च्या ग्रँड फिनालेमध्ये प्रसिद्ध कथक नृत्यांगना स्वरांजली यांनी आपली नृत्य प्रस्तृती केली. विशेषत: जयहिंदने तयार केलेल्या पोशाखात पुरुष मॉडेलने रॅम्प वॉक केला तर महिलांचे पोशाख नम्रता काळे यांनी डिझाइन केले होते.

यावेळी परिक्षकांच्या रूपात जयहिंदच्या शलाका, प्रसिद्ध मॉडेल राहुल पाटील आणि पुर्व मिसेस महाराष्ट्रा राधिका सुधीर उपस्थित होते. विजेत्यांची निवड करताना अनुक्रमे अब्दुल रेहमान मिस्टर पुणे -2021 आणि शानिया मायकेल मिस पुणे 2021 टायटलचे मानकरी ठरले. यावेळी सॅम चर्चिल ऑफिशीयल कोरिओग्राफर होते व ही स्पर्धा साजिद शेख, सीईओ जॅझमटाझ यांनी आयोजित केली होती.

Leave a Reply