गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बाप्पाचे दर्शनासाठी प्रचंड गर्दी, कोरोनाचे नियम धाब्यावर

पुणे: भारतासह जगभरात साजरा केला जाणाऱ्या गणेशोत्सवाला आजपासून सुरूवात होत आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थानिक प्रशासनाकडून गर्दी न करण्याचे, करोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु या सर्व परिस्थितीचा स्थानिक नागरिकांना विसर पडला आहे. कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून पुणेकरांनी आज गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. नागपुरात तर ऐन गणेशोत्सवाच्या दिवसात निर्बंध लावण्याची वेळ आली आहे. मात्र गणेशोत्सवाच्या आनंदात नागरिक करोनाला पूर्णपणे विसरले आहेत. आधी खरेदीसाठी आणि नंतर गणेश दर्शनासाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. आज पहिल्याच दिवशी पुण्यात दगडूशेट गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी प्रचंड गर्दी केली. त्याचप्रमाणे तुळशीबाग गणपती, मंडई गणपती आणि तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या दर्शनासाठीही नागरीक गर्दी करीत आहेत. गणेशोत्सवातील ही गर्दी पाहून करोनाची तिसरी लाट लवकरच येईल अशी शक्यता टास्कफोर्सने व्यक्त केला आहे.      

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: