संतापजनक : मुंबईत निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती, सामूहिक बलात्कारानंतर महिलेच्या गुप्तांगावर वार

मुंबई : पुणे शहरातील सामूहिक बलात्काराच्या घटना ताज्या असतानाच मुंबईत निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. मुंबईतील साकीनाका परिसरात खैरानी रोड येथे  एका 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. इतकेच नव्हे तर आरोपींनी बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात सळई टाकण्याचा अमानुष कृत्य केले आहे. यामुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरासह राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही सामूहिक बलात्काराच्या घटना वाढत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दरम्यान, ही घटना गुरुवारी मध्यरात्री (9 ऑगस्ट) घडली. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पीडित महिलेची प्रकृती अत्यंत नाजूक असून तिला अद्यापही शुद्धीवर आलेली नाही. तिच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर घटना ही दहा वर्षांपूर्वी दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कारासारखी आहे. त्यामुळे आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या पुणे जिल्ह्यात आठवड्यात तीन सामूहिक बलात्काराच्या घटना

पुणे जिल्ह्यात आठवड्याभरात अल्पवयीन मुलींवर बलात्कार व सामूहिक बलात्काराच्या तीन घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे मुली आणि महिला राज्यात खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होऊ लागला आहे. मागील आठवड्यात वानवडी परिसरात 14 वर्षीय मुलीवर रेल्वे कर्मचारी व रिक्षा चालकांनी बलात्कार केल्याची घटना घडली. हीच घटना ताजी असतानाच रेल्वे स्टेशन परिसरात झोपलेल्या अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे या घटनेतही अत्याचार करणारा हा एक रिक्षाचालक आहे. तर खेड येथे 12 वर्षीय चिमुकलीवर 5 नराधमांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पुणे परिसरात वारंवार अशा घटना होत असल्याने परिसरात संतांपाचे वातावरण आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: