‘हिंदी मीडियम’ फेम अभिनेत्री सबा कमर विरोधात अटक वॉरंट

‘हिंदी मीडियम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री सबा कमर आता कायदेशीर अडचणीत सापडली आहे. पाकिस्तानच्या एका स्थानिक न्यायालयाने तिच्या आणि तिच्या एका सहकाऱयाविरोधात लाहोरमधील ऐतिहासिक मशिदीत डान्स व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी अटक वॉरंट बजावले आहे.

मागील वर्षी लाहोर पोलिसांनी सबा कमर आणि बिलाल सईद यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला होता. एफआयआरनुसार दोन्ही कलाकारांना डान्स व्हिडिओ तयार करून ऐतिहासिक मशिदीच्या पावित्र्याला धक्का पोहोचविला होता.

तर याप्रकरणी मोठा वादही उभा ठाकला होता. याप्रकरणी सरकारने दोन वरिष्ठ अधिकाऱयांना बडतर्फ केले होते. तसेच सोशल मीडियावर सबाला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.

न्यायालयीन सुनावणीसाठी सातत्याने गैरहजर राहिल्याने सबा आणि गायक बिलाल विरोधात जामिनपात्र वॉरंट बजावण्यात आल्याचे समजते. याप्रकरणी पुढील सुनावणी 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर वाद वाढल्यावर सबा आणि बिलालने याकरता माफी मागितली होती.

Leave a Reply

%d bloggers like this: