Wednesday, November 18, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

‘या’ चार राज्यांसाठी नवीन राज्यपाल नियुक्ती

दिल्ली : बेबी राणी मौर्य यांनी उत्तराखंडच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन राज्यपालांची नियुक्ती कधी होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष होते.  त्यानंतर आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उत्तराखंड, पंजाब, तामिळनाडू आणि नागालँडच्या या चार राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती केली आहे.

बेबी राणी मौर्य यांनी आपल्या वैयक्तिक कारणांमुळे उत्तराखंडच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला होता. मौर्य यांनी 26 ऑगस्ट 2018 रोजी  उत्तराखंडच्या राज्यपालपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्या रंजीनाम्या नंतर रिक्त झालेल्या उत्तराखंड राज्याच्या राज्यपालपदी सेवानिवृत्त ले. जनरल. गुरमित सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर तामिळनाडूचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांच्याकडे पंजाबचा कार्यभार देण्यात आला आहे. आर. एन रवी यांच्याकडे नागालँडचे राज्यपालपद होते. मात्र, आता त्यांना तामिळनाडू राज्यपालपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर आसामचे विद्यमान राज्यपाल जगदीश मुखी यांच्याकडे नागालँडच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

 

Leave a Reply