रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ कोटी ३६ लाखांचा निधी

मुंबई :  रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) साठी 2 कोटी 36 लाख 84 हजार 757 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वर्षा निवासस्थान येथे सुपूर्द केला. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.

रयत शिक्षण संस्थेच्या राज्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांनी या निधीसाठी एक दिवसाचे वेतनाचे योगदान दिले आहे. या निधीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ साठी देण्यात आला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: