अँटिलिया प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी परमबीर सिहांनी सायबर एक्सपर्टला दिली लाच

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाखल केलेल्या एका चार्जशीटमध्ये एजन्सीमधील एका सायबर एक्सपर्टने  धक्कादायक माहिती दिली आहे. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अॅंटिलिया स्फोटक प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी जैश-उल-हिंद नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधिक अहवालात छेडछाड केली असल्याचा दावा या एक्सपर्टने केला आहे. यासाठी परमबीर सिंह यांनी सायबर एक्सपर्टला पाच लाखांची लाच दिली असल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

त्या वृत्ता नुसार, सायबर एक्सपर्टने एनआयएला आपला जबाब दिला होता.  ज्यामध्ये सायबर एक्सपर्टने सांगितले की, अँटिलिया घटनेनंतर ‘जैश-उल-हिंद’ या अतिरेकी संघटनेनं या घटनेची जबाबदारी स्वीकारली, असे त्यांना त्यांच्या अहवालात लिहिण्यास सांगितले होते. त्यासाठी दिल्लीत इस्रायल दूतावासासमोर स्फोट झाल्यानंतर टेलिग्राम चॅनेलचा वापर करण्यात आला होता.

Leave a Reply

%d bloggers like this: