खुन्नसने बघितले म्हणून २० वर्षीय तरुणाचा खुन; तीन अल्पवयीन मुलांसह सहाजण अटकेत

पिंपरी : खुन्नस ने पाहण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनामध्ये झाल्याची घटना घडली आहे. चिंचवडमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलांनी एकमेकांडे खुन्नस ने पाहिले म्हणून झालेल्या वादात वीस वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. गणेश याड्रमी अस खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खुन्नसने बघितले म्हणून झालेल्या वादात अल्पवयीन तिघांसह सहा मुलांनी मिळून चाकू, कोयता आणि लाकडी बांबूनी हल्ला करून ठार केले.

या प्रकरणी तिघा आरोपींनी पोलिसांंनी अटक केली असून 3 अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे. अमेय उर्फ बंटी शांताराम ठाकरे (शिक्षण 10 वी पास), आकाश जालिंदर गायकवाड, प्रकाश जालिंदर गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यात सहभागी असलेला एक अल्पवयीन १०वीत शिकत आहे, दुसरा १० वी पास आहे तर तिसरा १२वी पास आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गणेश याचा मित्र हितेश पाटील वय- 16 वर्षे याचे आणि यातील अल्पयीन आरोपी यांच्यात एकमेकांकडे खुन्नस ने पाहण्यावरून वाद झाला होता. तेव्हा, बदला घेण्याच्या हेतूने दहशत माजवत आरोपी बंटी ठाकरे याने त्याच्या जवळील चाकूने हितेशवर हल्ला केला. यामध्ये मध्ये पडलेल्या गणेश याड्रमी याच्या (छातीत) पोटात चाकू खुपसून त्याचा खून केला.

इतर अल्पवयीन आरोपींनी त्यांच्याकडील कोयते, लाकडी बांबूंनी मयताचे मित्र यांना मारून जखमी केले. या घटनेत दहावीत शिक्षण घेणाऱ्या आणि उत्तीर्ण झालेल्या मुलांचा सहभाग असल्याने गुन्ह्याचे गांभीर्य वाढले आहे. अल्पवयीन मुलांच्या वादात हकनाक वीस वर्षीय गणेश ला आपला जीव गमवावा लागला आहे. घटनेच्या काही अंतराने सर्व आरोपी फरार झाले होते. त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक ठुबल यांच्या पथकाने अवघ्या 12 तासाच्या आत जेरबंद केले आहे. सहा आरोपी पैकी 3 हे अल्पवयीन आहेत, त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: