नेस वाडिया महाविद्यालयाच्या डॉ.वृषाली रणधीर यांना गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

   पुणे : पूना कॉलेज आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सच्यावतीने  “गुणवंत आदर्श शिक्षक” पुरस्कार २०२१  प्रदान करण्यात आला. नेस वाडिया महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण आणि सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पुना कॉलेजचे प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख, उपप्राचार्य इक्बाल शेख ,मोईनूदिन खान , उपप्राचार्य इम्तियाज आगा , उपप्राचार्य नाज सय्यद , सुपरवायझर नसीम खान, क्रीडा शिक्षक अशद शेख, क्रीडा शिक्षक इम्रान पठाण उपस्थित होते.
शिक्षक दिन व “आभार शिक्षकांचे” अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह पूना कॉलेज मध्ये राबवण्यात आला. या निमित्त पुना कॉलेजमध्ये विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पोस्टर  मेकिंग,  ग्रीटिंग कार्ड बनवणे ,निबंध लेखन ,चित्रकला स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा , गुणवंत शिक्षक पुरस्कार आणि शिक्षक गौरव समारंभ अशा विविध उपक्रमांचे ऑनलाइन  स्वरूपात आयोजन करण्यात आले होते.
डॉ. आफताब अन्वर शेख म्हणाले, शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असते. व्यक्ती ,समाज ,राष्ट्रनिर्मिती साठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. तसेच ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्याबरोबरच, आदर्श नागरिक निर्माण करण्याचे अतुलनीय व अविरत  कार्य पार पाडण्याची जबाबदारी शिक्षकांची असते, असेही त्यांनी सांगितले.

स्पर्धेचा निकाल – (पोस्टर )भिंतीचित्र स्पर्धा: १ .मर्जिया शेख, २ .शाहीन मेमन, ३.सालेहा शेख – भेटकार्ड तयार करणे स्पर्धा: १ .शेख सुराखा अहमद नूर २.राजेश्वरी सुरवसे ३.तस्मिया सिद्दीक – वक्तृत्व स्पर्धेचे विजेते: १ .शाहीन मेमन, २.राजेश्वरी सुरवसे, ३. प्रगती पवार, ४. शेख युसराह

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकीत पटेल, प्रमुख पाहुण्याची ओळख सुपरवायझर लुबना खान व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन  प्रा. एजाज शेरदी यांनी केले.
एन. एस .एस. कार्यक्रमाधिकारी व एन. सी.सी. प्रमुख शाकीर शेख विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी डॉ .बाबा शेख,  इम्रान बेग मिर्झा आणि प्रा. फारुख शेख, यांनी तांत्रिक योगदान दिले.

Leave a Reply

%d bloggers like this: