Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची प्राणप्रतिष्ठापना दुपारी 12 वाजता; डॉ. अविनाश भोंडवे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना

पुणे : अखिल मंडई मंडळाचा १२८ वा गणेशोत्सव मागील वर्षाप्रमाणे यंदाही साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. मंदिरातच शारदा गजानन विराजमान होणार आहेत. गणेश चतुर्थीला शुक्रवार, दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे आणि मीना भोंडवे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. अविनाश कुलकर्णी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होईल, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.

आॅनलाईन पद्धतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सकाळी ६ वाजल्यापासून प्रात:पूजा, आरती, गणेशयाग,सायंपूजा आणि संध्याकाळी ७.३० वाजता महाआरती होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातून शारदा गजाननाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्त येतात. त्यामुळे उत्सवकाळात २४ तास आॅनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली आहे. मंडळाच्या https://akhilmandaimandal.org/ या वेबसाईट वरुन शारदा गजाननाचे दर्शन घेता येणार आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

अण्णा थोरात म्हणाले, दरवर्षी उत्साहात आणि सर्व जाती धर्मातील आणि मंडईतील कष्टकरी लोकांना सामावून घेऊन अखिल मंडई मंडळाचा गणेशोत्सव साजरा होत असतो. १२८ वर्षाच्या इतिहासात दुसऱ्यांदा मंदिरातच गणेशोत्सव साजरा होणार आहे. परंतु पुढील वर्षाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी यंदा सगळ्यांनीच काळजी घेणे आवश्यक आहे.

*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळातर्फे अधिक काळजी घेण्यात येणार आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत असली तरी, अजूनही काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मंडळाच्या वतीने लसीकरण मोहिम देखील राबविण्यात येत आहे. यासोबतच कमीत कमी गणेशभक्त मंदिरात असतील. यासोबतच प्रत्येक २ तासांनी फॉग मशीनच्या सहाय्याने पूर्ण मंदिर सॅनिटाईज केले जाणार आहे. त्याशिवाय आॅकिसमीटर, आणि थर्मामीटरच्या सहाय्याने प्रत्येकाची तपासणी केली जाणार आहे. मंडळात येणाºया प्रत्येकासाठी मास्क बंधनकारक आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading