अॅम्बेसेडर प्रियंका चोप्रासह बुलगरी या एक्स्लुझिव ज्वैलरीचे भारतात पदार्पण

 

पुणे  : बुलगरी हा ख्यातनाम रोमन ज्युलरी ब्रँड या ब्रँडने आपल्या ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर प्रियंका चोप्रा जोनससह आज भारतातील पहिले वहिले आणि भारतातील ज्युलरी स्टेटमेंट पीसची प्रेरणा असलेले एक्स्लुझिव द बुलगरी बुलगरी मंगळसूत्र हे कलेक्शन सादर केले आहे .१८ कॅरट सोन्यात काळ्या मण्यांची माळ आणि त्याला हिऱ्यांची जोड असलेल्या बुलगरी बुलगरी मंगळसूत्रातून या पारंपरिक आणि पवित्र दागिन्याला एक कंटेंपररी आणि स्टायलिश दागिन्याचे रूप देण्यात आले आहे. आपल्या मूळ रोमन तत्वांमधून प्रेरणा घेत प्रचंड संशोधन करून बुलगरीने हे एकमेवाद्वितीय असे सोन्याचे सुंदर मंगळसूत्र तयार केले आहे. हे मंगळसूत्र स्थानिक सांस्कृतिक परंपरांना एक नवा अर्थ देत आहेत.

बुलगरीच्या ज्युलरी बिझनेस विभागाचे व्यवस्थापकीय संचालक मॉरो डी रॉबर्टो म्हणाले की “आम्ही २०१४ मध्ये भारतात पुन्हा नव्याने आलो. तेव्हापासूनच भारतातील दागिन्यांची सांस्कृतिक परंपरा आणि त्यांची खोलवर रुजलेली भूमिका यामुळे भारावून गेलो आहोत. आधुनिक भारतीय स्त्रीसाठी ती वापरत असलेल्या दागिन्यांमध्ये बहुतांश वेळा मंगळसूत्र फार महत्त्वाचं असतं.

बुलगरी आणि भारतासाठीच्या या खास दागिन्यांसोबत जोडले जाण्याबद्दल प्रियंका चोप्रा जोनस म्हणाली की “बुलगरीच्या अप्रतिम कलाकारीने मी नेहमीच आकर्षित झाले आहे आणि मी त्यांचे नेहमी कौतुकही केले आहे. यातील अनेक दागिन्यांमधून माझ्या मायदेशातील मौल्यवान घटक प्रतित होतात.

Leave a Reply

%d bloggers like this: