पुणेकरांना पहायला मिळणार जिराफ

पुणे: महापालिकेच्या कात्रज येथील स्वगीय राजीव गांधी प्राणी संग्रहालयात लवकरच पुणेकराना जिराफ पहायला मिळणार आहे त्यासाठी खंदक तयार करण्याचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले असून हे काम पूर्ण होत असतानाच जिराफ मागविण्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालयाच्या प्राधिकरणास प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या प्रशासकीय सूत्रांनी दिली.
कोरोनाच्या  प्रादुर्भावामुळे प्राणी संग्राहालये बंद आहेत.त्याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने नवीन जिराफ लवकरात लवकर राजीव गांधी प्राणी संग्रालहयात आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मंजुरी भेटली असून . लवकरच राजीव गांधी प्राणी
संग्रहालयात नवीन जिराफ पाहायला मिळतील असे महापालिकेच्या प्रशासकीय सूत्रांनी सांगितले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: