सैनिकांनी अनाथ मुली, अर्धांगवायू महिला आणि वृद्धांसाठी बांधलेले ‘घर’
पुणे : आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्यापेक्षा कमी भाग्यवान असलेल्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा असते. त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काही तरी करतो. काही जण भाग्यवान असतात की त्यांच्या स्वप्नांना पंख देता येतात. ‘घर’ हे अशाच एका स्वप्नाची परिणीती आहे.
घर हे अनाथ मुली, अर्धांगवायू महिला आणि वृद्धांसाठी एक घर आहे. केंद्रीय विद्यालय बीईजी आणि डेक्कन कॉलेज दरम्यानच्या रस्त्यावरील गुरुद्वारा दशमेश दरबार समोर स्थित, ही एका घराची प्रतिक आहे जिथे मुले, पालक आणि आजी आजोबा अशा तीन पिढ्यांचे रहिवासी एकाच छताखाली राहतात. या ग्राउंड प्लस सहा मजली इमारतीची क्षमता 40 मुली, 10 अर्धांगवायू महिला आणि 19 ज्येष्ठ नागरिक राहू शकतील इतकी आहे.
“याठिकाणी 6-12 वर्षे वयोगटातील अनाथ/उपेक्षित मुलींना त्यांच्यातील क्षमतांची जाणीव करून देण्यासाठी योग्य संधी उपलब्ध करून दिली जाईल, पक्षाघातग्रस्त महिलांना समाजाचे उत्पादक सदस्य बनण्यासाठी आणि वृद्धांना निरोगी, परिपूर्ण आणि समाधानी जीवन जगण्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा देण्यात येतील. याठिकाणी मुली आणि अर्धांगवायूने ग्रस्त स्त्रिया मोफत राहतील, तर वृद्धांसाठी ‘सेल्फ सस्टेनेबल’ तत्वावर ही सुविधा उपलब्ध असेल. याबाबत संत ईश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष कर्नल मिकी उबेराय (निवृत्त) म्हणाले,” मानवतेची सेवा करण्यासाठी चार निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या चमूने 2018 मध्ये नोंदणीकृत सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टची स्थापना केली. यामध्ये आता सात ज्येष्ठ सदस्यांचा समावेश आहे.
ते पुढे म्हणाले, “अनाथ / उपेक्षित मुली आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होईपर्यंत आणि आयुष्यात स्थायिक होईपर्यंत त्यांना पाठिंबा देण्याचा आमचा मानस आहे. आम्हाला आशा आहे की याठिकाणी ते मानवतेचा, सहानुभूतीचा आणि प्रेमाचा संदेश घेऊन जातील आणि समाजात त्याचा प्रसार करतील. येणाऱ्या काळात समाजात प्रौढ नागरिकांचे सक्षमीकरण करत त्यांना कायद्याचे पालन करणारे नागरिक म्हणून समाजात मुख्य प्रवाहात आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. तसेच या संस्थेत नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा, शिक्षण, आरोग्याची देखभाल, योग्य आहार, मनोरंजनात्मक गोष्टी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आहेत.”
घर या संस्थेत अनाथ / उपेक्षित मुलींना सरकारी संस्थांद्वारे पाठवले जाईल. या सुविधेचे लाभार्थी बनू इच्छिणाऱ्या पक्षाघातग्रस्त महिलांची ओळख पटवण्यासाठी ट्रस्ट शासकीय रुग्णालये आणि संस्थांशी संपर्क साधेल. जागरूकता, दृश्यमानता आणि मौखिक प्रचाराद्वारे याठिकाणी वृद्धांपर्यंत याची माहिती पोहचविण्याचा प्रयत्न केला जाईल.
साथीच्या आजारामुळे ‘घर’ उघडण्यास विलंब झाला. वृद्धांसाठीचे घर आता 2 ऑक्टोबर रोजी उघडले जात आहे. आणि त्यानंतर अर्धांगवायू असलेल्या महिलांसाठी घर खुले होता आहे. चाइल्डकेअर होम दुसऱ्या टप्प्यात उघडेल.
संपर्कासाठी माहिती:
मोबाईल: 9372468457, 8605948093
ईमेल: santishwarfdn@rediffmail.com
वेबसाइट: ghar-home.in
देणगीसाठी बँक तपशील:
एचडीएफसी बँक लि.
9/2 कल्पतरू गार्डन, बोट क्लब रोड, पुणे – 411001
A/C नाव: संत ईश्वर फाउंडेशन
बचत खाते/क्रमांक: 50100290200233
RTGS/NEFT IFSC: HDFC0000039
(आयकर कायद्याच्या कलम 80G अंतर्गत देणगी आयकरातून मुक्त आहे)
