fbpx

भारतीय कामगार सेना आणि मरकळ येथील कपारो इंजिनिअरिंग कंपनी यांच्यामध्ये वेतन करार

पुणे : कोरोनाच्या जागतिक महासंकटाच्या पार्श्वभूमीवर कपारो इंजीनियरिंग इंडिया लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापनाबरोबर चर्चा करून भारतीय कामगार सेनेने वेतनवाढ करार पूर्णत्वास नेला आहे. कंपनीतील कामाची परिस्थिती आणि ब-याच काळापर्यंत चाललेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक क्षेत्रात जे महासंकट आर्थिक क्षेत्रात आलेले आहे. त्या संकटावर मात करून कामगारांच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करत भारतीय कामगार सेनेने एकूण 10,100 रुपयांचे एकूण वेतन करार यशस्वी करण्यात यश आले आहे.

कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांना ज्या इतर सवलती देण्यात आल्या त्यामध्ये महिन्यातून एक दिवस पगारी रजा, कंपनीचे दोन युनिफॉर्म, एक जॅकेट, दोन टी-शर्ट तसेच सेक्युरिटी शुजचे दोन जोड देण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना उपनेते व भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक, कंपनी व्यवस्थापनाकडून सरोज शाहू,  शरद पाठक, प्रेम सिन्हा, तन्मय मुखर्जी आणि भारतीय कामगार सेनेचे कपारो युनिट अध्यक्ष विजय लोखंडे, संतोष कुमार, निलेश पाचपुते, अण्णा जुमळे यांनी करारावर स्वाक्षरी केल्या. सदर वेतनवाढ कराराने मरकळ औद्योगिक क्षेत्रातील वातावरण उत्साही आणि आनंददायी झाले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: