प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेकरीता लाभार्थ्यांना अन्न वितरणाकरीता ५ सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ

 

पुणे : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत माहे ऑगस्ट २०२१ व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेकरीता लाभार्थ्यांना अन्न वितरण करणेकरीता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडील सूचनेनुसार दि. ५ सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुणे जिल्हा ग्रामिण मधील ज्या पात्र लाभार्थ्यांनी माहे ऑगस्ट २०२१चे नियमित व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे (मोफत) अन्नधान्य स्वस्त धान्य दुकानांमधून घेतलेले नाही. त्या पात्र लाभार्थ्यांना आवाहन करणेत येते की, दि. ५ सप्टेंबर २०२१ पर्यंत त्या लाभार्थ्यांनी आपल्या संबंधित स्वस्त धान्य दुकानामध्ये माहे ऑगस्ट २०२१ च्या नियमित व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे मोफत अन्नधान्य उपलब्ध होईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी
सुरेखा माने यांनी कळविले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: