fbpx

इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशन – २२ यार्ड्स, पीवायसी, जिल्हा संघ विजयी

पुणे : इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत २२ यार्ड्सपीवायसीजिल्हा संघांनी विजय साकारला.

डीव्हीसीए मैदानावर झालेल्या लढतीत २२ यार्ड संघाने डीव्हीसीए संघाला ६ गडी राखून पराभूत केले.  प्रथम फलंदाजी करताना डीव्हीसीए संघाला १०.१ षटकांत सर्वबाद ३१ धावाच करता आल्या. हर्षवर्धन पाटील व अथर्व शिंदे  यांनी भेदक गोलंदाजी अनुक्रमे ६ व ४ गडी बाद केले. २२ यार्ड संघाने ८.१ षटकांत हे आव्हान ४ गाड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करताना विजय साकारला. डीव्हीसीएच्या तिलक जाधवने ३ तर हर्षवर्धन पवारने १ गडी बाद करताना चांगली लढत दिली. २२ यार्ड्सच्या हर्षवर्धन पाटील याला सामनावीर जाहीर करण्यात आले.

पीवायसी मैदानावर झालेल्या लढतीत  पीवायसी संघाने मेट्रो संघाला ६ गडी राखून पराभूत केले. मेट्रो संघाने निर्धारित ५० षटकांत ९ बाद २३३ धावा केल्या. नित्याय लुंकड (५४)यश बर्गे व शशिकांत पवार (३८) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर ही धावसंख्या उभारली. स्वराज चव्हाण याने ४ गडी बाद करताना भेदक गोलंदाजी केली. पीवायसी संघाने हे आव्हान ४६.५ षटकांत ४ गाड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. सोहम शिंदे (९२)यतीन कार्लेकर ४१रिषभ रानडे ३६ यांनी आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या लढतीत स्वराज चव्हाण सामनावीर ठरला.

डेक्कन जिमखाना मैदानावर झालेल्या लढतीत जिल्हा संघाने डेक्कन जिमखाना संघाला ७९ धावांनी पराभूत केले. जिल्हा संघाने निर्धारित ५० षटकांत २५७ धावा केल्या. अभिषेक पवार (६४)सौरभ शिंदे (४७) देव नवले (३९) यांनी संघाला ही धावसंख्या उभारून दिली. सौरभ शिंदे यांच्या भेदक गोलंदाजी समोर डेक्कन जिमखाना संघ ४६.२ षटकांत सर्व बाद १७८ एवढीच धावसंख्या करू शकला. सौरभने ६ गडी बाद करताना संघाला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक : डीव्हीसीए : १०.१ षटकांत सर्वबाद ३१ ( तिलक जाधव १०१ चौकारअंश धूत ४१ चौकारहर्षवर्धन पाटील ५-१-१२-६अथर्व शिंदे ५-१-१७-४) पराभूत वि २२ यार्ड : ८.१ षटकांत ४ बाद ३४ (तेजस तोळसनकर १३३ चौकार,  गौरव कुमकर ८१ चौकारतिलक जाधव ४-१-१३-३हर्षवर्धन पवार ४.१-०-१८-१सामनावीर : हर्षवर्धन पाटील२२ यार्ड

Leave a Reply

%d bloggers like this: