कर्करोगाशी झुंजणार्या मुलांसाठी, कल्याणीनगर येथे एक्सेस लाइफ असिस्टन्स फाउंडेशनचे नवीन केंद्र

पुणे – एक्सेस लाइफ असिस्टन्स फाउंडेशन ही भारतीय ना नफा ना तोटा तत्वावर चालणारी संस्था आहे, ही सेक्शन ८ मधिल २०१४ ची एक नोंदणीकृत कंपनी आहे, जी मुंबई आणि पुण्यात येणाऱ्या कुटुंबांना त्यांच्या मुलांच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये सहाय्यता प्रदान करते व त्यांची काळजी घेते.

एक्सेस लाइफ मुलांना आणि त्यांच्या कुटुंबांना स्वच्छ आरोग्यदायी घर तर देतेच , याचबरोबर ते व्यावहारिक सहाय्य सेवा, शैक्षणिक संसाधने आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम देऊन त्यांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या सेवांमध्ये मोफत निवास, रेशन, सुरक्षित वाहतूक आणि प्रत्येक मुलासाठी स्वच्छतेसंबंधी वस्तूंसह क्लिन व केयर किट समाविष्ट आहे.

भारतात दरवर्षी ५०,००० पेक्षा जास्त मुलांपुढे कर्करोगाचे आव्हान असते.  रुग्णालये त्यांना दर्जेदार वैद्यकीय सेवा देत असतानाच, बरेचदा गरीब कुटुंबांना उपचार पूर्ण करण्यासाठी ५ ते १२ महिन्यांचा कालावधी लागतो (कधीकधी २४ महिन्यांपर्यंत) अश्यातच त्यांना राहण्यासाठी जागा नसते. अनेक जण फुटपाथवर राहतात किंवा मुंबईसारख्या महानगरांमध्ये महागड्या निवासी किंमतीमुळे काहींना उपचार सोडून द्यावे लागतात. कर्करोगाशी झुंज देणारी आणि योग्य निवास व पोषण न मिळालेली मुले दुय्यम संक्रमित होण्याचा धोका वाढतो. , जर मुलांचे लवकर निदान झाले आणि योग्य पायाभूत सुविधांसह योग्य व्यवस्थापन केले गेले तर बाल- कर्करोग बरा होऊ शकतो. या वर्षी आपल्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त, एक्सेस लाइफ ने कल्याणीनगर, पुणे येथे त्यांचे नवीन केंद्र सुरू केले आहे. ही पहिली बालरोग, कर्करोग स्वयंसेवी संस्था आहोत जी पुण्यात कर्करोगाच्या गरजू मुलांना मोफत निवास प्रदान करते. 

एक्सेस लाइफचे सह-संस्थापक अंकित दवे म्हणाले, “पुण्यात आमचे केंद्र सुरू केल्याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. पुण्यातील आमचा हा विस्तार डॉक्टर, रुग्णालये आणि कुटुंबांना पाठिंबा देण्याबरोबरच बाल-र्करोगाविषयी जागरूकता पसरविण्यास मदत करतो देतो. ” डॉ. विभा बाफना, एमडी, डीसीएच, सहाय्यक प्राध्यापक आणि भारती विद्यापीठ हॉस्पिटलमधील पिडियाट्रीक-हेमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट म्हणतात की “एक्सेस लाइफ आमच्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना घरापासून दूर स्वच्छ आणि सुंदर घरे देऊन उत्कृष्ट सहाय्य प्रदान करत आहेत. आरामदायक निवासासाठी ते वाहतूक, रेशन, शिक्षण आणि बर्‍याच गोष्टी देखील प्रदान करतात. ”

Leave a Reply

%d bloggers like this: