मातंग समाजाचा विभागीय आयुक्त कार्यालयावर आक्रोश

पुणे : सोलापूर जिल्ह्यातील बोरगाव ता.माळशिरस जिल्हा सोलापूर येथील साठे कुटुंबीयावर स्थानिक जातीयवादी लोकांनी केलेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी पुणे शहर जिल्हा मातंग समजाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालाय पुणे समोर तीव्र निदर्शने करून आक्रोश व्यक्त करण्यात आला . .मातंग समजातील व्यक्तीला अत्यविधी करू दिला नव्हता त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र भर या घटनेचा निषेध करण्यात येत आहे .आज पुणे शहर व जिल्ह्यातील विविध संघटनांच्या वतीने जातीयवादी घटनेचा निषेध करण्यात आला.
या वेळी आरोपींना कड्क शिक्षा करण्यात यावी . पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे यासाह विविध मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त सौरभ राव यांचाकडे देण्यात आले .या वेळी पीडित कुटुंबातील दशरथ साठे उपस्थित होते .नगरसेवक सुभाष जगताप , अनिल हातागळे अध्यक्ष ,पुणे शहर मातंग समाज अध्यक्ष राजाभाऊ धडे ,विनोद शिंदे सह सचिव,लहुजी शक्ती सेना शंकर तडाखे ,दलीत युवक आंदोलन संस्थापक सचिन बगाडे ,राजश्री अडसूळ ,रवी पाटोळे ,मातंग एकता आंदोलनाचे शहरध्यक्ष विठ्ठल थोरात , महेश सकट , यासह पुणे शहरातील विविध पक्ष ,संघटनाचे प्रमुख नेते,,कार्यकर्ते महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी होते.

Leave a Reply

%d bloggers like this: