fbpx

ओबीसी आरक्षणाचा केंद्र व राज्य सरकारकडून खून – संभाजी ब्रिगेड

ओबीसी आरक्षणासाठी पुण्यात संभाजी ब्रिगेड चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन…

पुणे : महाराष्ट्रासह देशात ओबीसी संघटित नाही. झोपेचे सोंग घेतले असल्यामुळे असंघटित ओबीसी आरक्षणावर सतत अन्याय होत आहे. देशात कुत्र्या-मांजराची, मुक्या जणावरांची जनगणना होते, मात्र ओबीसींची जातनिहाय जनगणना होत नाही. सर्वपक्षीय नेत्यांनीच ओबीसी आरक्षणाचा खून केला. त्यामुळे आम्ही मेल्यानंतर तरी आमच्या मुलांना ओबीसी आरक्षणाचा संपूर्ण लाभ होणार आहे की नाही हे सांगा…? सगळ्या पक्षांनी ओबीसींचा फक्त वापरा आणि हस्तांतरित करा हे धंदे बंद केले पाहिजेत. इंम्पिरिकल डेटा हे OBC चे रक्त आहे, राष्ट्रीय संपत्ती असून संपूर्ण डेटा राज्य सरकारला देऊन रद्द केलेले ओबीसी आरक्षण परत ओबीसींना मिळाले पाहिजे… व ‘महाराष्ट्रामध्ये ओबीसींची जातनिहाय राष्ट्रीय जनगणना झाली पाहिजे… असे मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.

ओबीसी च्या जनगणने शिवाय किंवा इंम्पिरिकल डाटा राज्य सरकारला मिळाल्याशिवाय ‘पुणे जि.प. व महानगरपालिकेची निवडणूक’ संभाजी ब्रिगेड होऊ देणार नाही. आम्ही यासाठी आर या पारची लढाई लढू याची दखल राज्य सरकारने घ्यावी… असे मत पुणे शहर अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी व्यक्त केले.

या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना संभाजी ब्रिगेड च्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेड’चे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा मोहिनी रणदिवे, जिल्हा कार्याध्यक्ष साजिद सय्यद, सोशल मिडिया अध्यक्ष अशोक फाजगे, शिवश्री संदिप कारेकर, पुणे शहर सचिव शिवश्री ज्योतिबा नरवडे उपाध्यक्ष पुणे श्रीमन श्रीमती माया पवार कोथरूड विधानसभा अध्यक्ष, सनी देशमुख उपाध्यक्ष खडकवासला विधानसभा, सचिन गायकवाड सोशल मीडिया प्रमुख पुणे शहर, नितीन वाघेरे पुणे शहर कार्याध्यक्ष, अभिजित मोरे उपाध्यक्ष पुणे शहर, नंदू ढोरे उपविभागप्रमुख आशिष जासकर संघटक पुणे शहर . महादेव घाग विभाग प्रमुख शिवाजीनगर, जिल्हा उपाध्यक्ष महादेव मातेरे, मावळ लोकसभा कार्याध्यक्ष दिनकर केदारी, संघटक अंकुश हाके, संघटक हनुमंत गुरव, संतोष सुर्यवंशी, सोशल मिडिया जिल्हा कार्याध्यक्ष ऋषिकेश कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: