ईपीएल लिमिटेडची रिसायकलेबल टूथपेस्‍ट ट्यूब्‍सच्‍या निर्मितीसाठी कोलगेट-पामोलिव्‍ह लिमिटेडसोबत भागीदारी

पुणे : ईपीएल लिमिटेड या जगातील आघाडीच्‍या स्‍पेशालिटी पॅकेजिंग कंपनीने आज घोषणा केली की, त्‍यांनी भारतामध्‍ये रिसायकलेबल प्‍लॅटिना टूथपेस्‍ट ट्यूब्‍सच्‍या निर्मितीसाठी कोलगेट-पामोलिव्‍ह इंडिया या सर्वात मोठ्या ओरल केअर ब्रॅण्‍डसोबत सहयोग केला आहे. रिसायकलेबल ट्यूब्‍सचा हा पहिला समूह कोलगेट-पामोलिव्‍हसाठी १०० टक्‍के रिसायकलेबल ट्यूब्‍समध्‍ये रूपांरित होण्‍यासाठी सुरूवातीचा टप्‍पा आहे.

ट्यूब पॅकेजिंग विभागामधील बाजारपेठ अग्रणी ईपीएल ग्राहकांच्‍या स्थिरतेसंदर्भातील वाढत्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी जागतिक दर्जाचे ट्यूब पॅकेजिंग इनोव्‍हेशन सादर करण्‍याशी कटिबद्ध आहे. ईपीएलने उच्‍च दर्जाची कार्यक्षमता लक्षात घेत आणि प्रमुख उत्‍पादने पैलू व कार्यक्षमतांबाबत तडजोड न करता कोलगेट-पामोलिव्‍हसाठी अद्वितीय रिसायकलेबल प्‍लॅटिना ट्यूब्‍सची निर्मिती केली आहे.

कोलगेट अॅक्टिव्‍ह सॉल्‍ट व कोलगेट वेदशक्‍ती पॅक करण्‍यासाठी ईपीएलच्‍या असोसएिशन ऑफ प्‍लास्टिक रिसायकलर्स, यूएसए मान्‍यताकृत १०० टक्‍के रिसायकलेबल व पूर्णत: रिसायकलेबल प्‍लॅटिना ट्यूब्‍समुळे हे इनोव्‍हेशन शक्‍य झाले. पोर्टफोलिओमध्‍ये इतर ब्रॅण्‍ड्स देखील याचा अवलंब करणार आहेत.ईपीएलची प्‍लॅटिना ही पर्यावरणास अनुकूल लॅमिनेटेड ट्यूब कोणत्‍याही प्रकारचे मूळ गुण न गमावता सोर्स रिडक्‍शन व रिसायकलेबिलिटी देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. ज्‍यामुळे जागतिक स्‍तरावर १०० टक्‍के रिसायकलेबल म्‍हणून मान्‍यता मिळालेले हे पहिले स्‍पेशालिटी पॅकेजिंग ट्यूब्‍स व कॅप्‍स आहेत.

ईपीएल लिमिटेडच्‍या एएमईएसएचे अध्‍यक्ष दीपक गंजू म्‍हणाले की आम्‍ही अनेक दशकांपासून कोलगेट-पामोलिव्‍ह इंडियाचे अभिमानी सहयोगी आहोत आणि या सहयोगाने आम्‍हाला उल्‍लेखनीय प्रथम उत्‍पादने निर्माण करण्‍यास सक्षम केले आहे, जी पहिल्‍यांदाच रिसायकलेबल ट्यूब्‍सच्‍या रूपांतरणाच्‍या माध्‍यमातून दिसून येत आहेत. अधिक पुढे जात आमचा विश्‍वास आहे की, स्थिरता हा पॅकेजिंग इनोव्‍हेशनचा आधारस्‍तंभ आहे आणि ईपीएल जागतिक स्‍तरावर स्थिर पॅकेजिंगसंदर्भात अग्रस्‍थानी आहे. ब्रॅण्‍ड आवश्‍यकतेप्रती कटिबद्धता आणि पर्यावरणावरील शून्‍य परिणामाप्रती आमच्‍या दृष्टिकोनासह आम्‍ही नवोन्‍मेष्‍कारी सस्‍टेनेबल ट्यूब पॅकेजिंग सोल्‍यूशन्‍स ऑफर करण्‍यासाठी सर्व ब्रॅण्‍ड्ससोबत सहयोग करण्‍यास कटिबद्ध आहोत.

Leave a Reply

%d bloggers like this: