मौखिक आरोग्यविषयक मार्गदर्शनासाठी विशेष कक्ष

पुणे : नागरिकांमध्ये मौखिक आरोग्य विषयक जनजागृती व्हावी,या उद्देशाने महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए.रंगूनवाला दंत रुग्णालयात
मौखिक आरोग्यविषयक मार्गदर्शनासाठी विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या पब्लिक हेल्थ डेंटिस्ट्री विभागाने त्यात पुढाकार घेतला आहे. दैनंदिन जीवनात दातांची घ्यायची काळजी,टूथ ब्रश,पेस्टची निवड,दात घासण्याची शास्त्रीय पद्धत,दात खराब होण्याची कारणे अशा मौखिक आरोग्यविषयक बाबींचे मार्गदर्शन केले जाते. महाविद्यालयाच्या पब्लिक हेल्थ डेंटिस्ट्री विभागाच्या प्रमुख डॉ.रेणुका नागराळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कक्ष सुरु असून डॉक्टर्स आणि प्रशिक्षणार्थी विद्यार्थी नागरिकांमध्ये जनजागृती घडवितात.शंकांचे निरसन करतात.संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी.ए . इनामदार,महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.रमणदीप दुग्गल,रजिष्ट्रार आर.ए.शेख यांनी या उपक्रमाबद्दल सहभागी डॉक्टरांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: