सुनील माने यांच्या वतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक उपक्रम म्हणून भारतीय जनता पार्टी पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्या वतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. ३ सप्टेंबर रोजी बोपोडी येथील डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला येथे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा महोत्सव आयोजित केला आहे. जास्तीत जास्त युवकांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन सुनील माने यांनी केले आहे.

कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक तरुण बेरोजगार झाले. त्याचप्रमाणे लॉकडाऊनमुळे अनेक कामगार स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांना मनुष्यबळाची गरज आहे. बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात तसेच कंपन्यांना मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी हा  नोकरी महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवा मध्ये पाचवी ते उच्च शिक्षण झालेल्या युवक युवतींसाठी नोकऱ्या उपलब्ध करून देत आहोत. यामध्ये हाऊसकीपिंग, आयटीआय, बीपीओ, केपीओ,उत्पादन क्षेत्र, हॉटेल, केमिकल, हार्डवेअर, खाद्य उद्योग या सोबतच अभियंता क्षेत्रातील पदविका तसेच पदवीधर, एमबीए सारख्या उच्च शिक्षित मुलांना तसेच अकुशल कामगारांना ही नोकरीची संधी येथे उपलब्ध होणार आहे. इच्छुकांनी https://cutt.ly/VQ5NtUK  या लिंकद्वारे नाव नोंदणी करून नोकरी महोत्सवातील आपला सहभाग निश्चित करावा असे सुनील माने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: