fbpx

‘कल्याण ज्वेलर्स’ने उघडले नाशिकमध्ये दालन

नाशिक : भारतातील सर्वात मोठ्या दागिन्यांच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘कल्याण ज्वेलर्स’ने नाशिकमध्ये आपले पहिले दालन आज उघडले आणि शरणपूर रोड, नवीन पंडित कॉलनी या परिसराला नवीन व संपन्न अशा ‘ज्वेलरी शॉपिंग डेस्टिनेशन’चे स्वरूप दिले. या शोरूमचे उद्घाटन ‘कल्याण ज्वेलर्स’च्या महाराष्ट्रासाठीच्या प्रादेशिक ब्रँड अॅम्बेसेडर पूजा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटनानंतर काही भाग्यवान ग्राहकांसोबत शोरूममध्ये ‘भेट व अभिवादन’ सत्रात बोलताना, कंपनीच्या ब्रँड अॅम्बेसेडर पूजा सावंत म्हणाल्या, “मी गेल्या काही वर्षांपासून कल्याण ज्वेलर्सशी संबंधित आहे. अशा नाविन्यपूर्ण आणि आयकॉनिक ब्रँडचा भाग असणे हा माझ्यासाठी अतिशय समृद्ध असा अनुभव आहे. महाराष्ट्राच्या वारशापासून प्रेरीत, वेडिंग ज्वेलरी कलेक्शन असलेल्या ‘हायपरलोकल ज्वेलरी डिझाईन्स’ची, विशेषतः ‘संकल्प’ या कलेक्शनची, मी फार मोठी प्रशंसक आहे. मला विश्वास आहे की ब्रँडला पूर्वीप्रमाणेच महाराष्ट्रातील ग्राहकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत राहील.”

‘कल्याण ज्वेलर्स’चे कार्यकारी संचालक रमेश कल्याणरामन यांनी नवीन शोरूमविषयी सांगितले, “नाशिकमधील आमची पहिली शोरूम सुरू करण्यात आम्हाला खूप आनंद होत आहे. गेली अनेक वर्षे, आम्ही राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये लक्षणीय स्वरुपात अस्तित्व निर्माण केले आहे. महाराष्ट्रात आमचे हे नववे दालन सुरू झाल्याने या बाजारपेठेसाठी असलेल्या आमच्या बांधिलकीची पुनरावृत्ती होत आहे. आम्ही उत्कृष्ट प्रतीचा खरेदीचा अनुभव ग्राहकांना देण्याचे ध्येय बाळगतो. त्यामध्ये, सुरक्षित, आरोग्यदायी आणि वैयक्तिकृत खरेदीचे वातावरण निर्माण करून आम्ही आमच्या ग्राहकांची व एकंदरीत समाजाची सुरक्षितता सुनिश्चित करतो.”

Leave a Reply

%d bloggers like this: