गो देसीचे ‘देसी पॉप्ज’

 ग्रामीण भागातील महिला बचत गट आणि उद्योजिकांद्वारे निर्मिती

मुंबई : गो देसी या अस्सल भारतीय चवीच्या स्वदेशी फूड ब्रँडने ‘देसी पॉप्ज’ म्हणजे देशी स्वाद असलेली लॉलीपॉप बाजारात आणली आहेत. गावांमधील महिला बचत गट आणि ग्रामीण भागातील महिला उद्योजिका गावांतील स्वयंपाकघरात आपल्या हाताने ही लॉलीपॉप बनवतात. ती अत्यंत नैसर्गिक पॉप आहेत व त्यामध्ये टॅंगी इमली, आंबट कच्चा आम, गोड रियल आम आणि खट्टा निंबू असे विविध फ्लेवर्स आहेत. गो देसीची सर्व उत्पादने शुगर फ्री असून त्यात अतिरिक्त प्रिझर्व्हेटिव्ह आणि रंग नाहीत. ही देसी पॉप्ज थेट शेतातून आलेल्या ताज्या घटक पदार्थांपासून बनवली जातात. ही उत्पादने २५०-३२० रुपयांत गो देसीसह अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि बिग बास्केटवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: