वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगीला अटक करा -संगीता तिवारी यांची मागणी

पुणे: अभिनेत्री पायल रोहतगी हिने देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू, राष्ट्रपिता महात्मा गांधी,माजी पंतप्रधान ईदिरा गांधी यांच्या बदल जाणीव पूर्वक खोटे आरोप करून  त्यांना बदनाम करण्यासाठी  व्हिडिओ  मला पाठवला त्या व्हिडिओ विरुद्ध सायबर  क्राईम मध्ये तक्रार  दाखल केली.अभिनेत्री पायल रोहतगी हिला पोलिसांनी अटक करण्यात यावी अशी मागणी पुण्यातील पत्रकार परिषदेत काँग्रेस पुणे शहर जिल्हा सरचिटणीस संगीता तिवारी यांनी केली.

या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे,आमदार मोहन जोशी उपस्थित होते. संगीता तिवारी म्हणाल्या,अभिनेत्री पायल रोहतगी हिने हा व्हिडीओ पाठवून काँग्रेस पक्षाचा अपमान केला आहे.आम्ही सायबर  क्राईम मध्ये तक्रार  दाखल केली आहे.आम्ही या घटनेचा निषेध करत आहोत.अभिनेत्री पायल रोहतगी यांना कोर्टाने अशाच एका आक्षेप विधानाबाबत समज दिली होती.तरीही त्या सातत्याने अशा प्रकारची आक्षेपाह विधाने करीत आहेत.असा आरोप संगीता तिवारी यांनी अभिनेत्री पायल रोहतगी हिच्यावर केला.

रमेश बागवे म्हणाले,मोतीलाल नेहरू, राष्ट्रपिता महात्मा गांधी,माजी पंतप्रधान ईदिरा गांधी यांच्या बदल जाणीव पूर्वक खोटे आरोप करून  त्यांना बदनाम करण्यासाठी  व्हिडिओ क्लिप अभिनेत्री पायल रोहतगी हिने पाठवला.आम्ही या घटनेचा निषेध करतो.तिने खालच्या पातळीवर भाषा वापरून राष्ट्रपिता महात्मा गांधी,माजी पंतप्रधान ईदिरा गांधी याचा अपमान केला आहे.आम्ही सायबर क्राईम ला तकार केली आहे.आम्ही परवा सायबर क्राईम ला तक्रार दाखल केली आहे.आमची एक मागणी आहे .अशा लोका वर कटोर कारवाई पोलिसांनी कारवाई केली पाहिजे.

मोहन जोशी म्हणाले,अभिनेत्री पायल रोहतगी हिने बऱ्याच वेळा काँग्रेस पक्षाचा अपमान केला आहे. अभिनेत्री पायल रोहतगी हिने दोन वर्षापूर्वी असाच
व्हिडीओ पाठवला होता. तिने राहूल गांधी,सोनिया गांधी याचा अपमान केला आहे.तिने राहुल गांधी यांच्या टीटवर पोस्ट टाकून अपमान केला होता.
जर पोलीसानि अटक केली नाही तर आम्ही ररत्यावर येवून आंदोलन करू .प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्ते त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल करतील.

Leave a Reply

%d bloggers like this: