तिसऱ्या लाटेचा अंदाज बघता जम्बो कोविड सेंटर सुरू राहणार

पुणे: राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना . तिसरी लाट लवकर येईल असे टास्क फोक्स चे डॉक्टर सांगत आहेत. 2 महिन्यापूर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरील जम्बो रुग्णालय महापालिकेने दुसरी लाट ओसरायला लागल्यामुळे बंद केले होते. तिसऱ्या लाटेचा अंदाज बघता तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. महापालिकेने उभारलेल्या जम्बो रुग्णालयात 600 ऑक्सिजन बेड ,100 आयसीयू बेड व 200 एचडीयु बेड या रुग्णालयात आहेत. महापालिकेकडून कोविड रुग्णांसाठी ही सोय केली आहे. महापालिकेने हे रुग्णालय परत सुरू केल्याने पुणेकरांसाह शहराबाहेरील नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे. या रुग्णालयाची मुदत 30 जून रोजी संपली होती त्यानंतर पुढे नऊ जुलै पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्याचे रुग्णालय पुढे सुरू ठेवायचे. असल्यास त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले असता 2022 पर्यंत वापर करता येऊ शकतो .त्यानंतर स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Leave a Reply

%d bloggers like this: