मोफत नेत्र तपासणी उपक्रम

पुणे – शांताई संस्था यांच्या सहकार्याने एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “अमतृदृष्टी आरोग्य कार्यक्रम”अंतर्गत येरवडा परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी उपक्रमाची सुरुवात मंगळवारी करण्यात आली. माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष अरुण वाघमारे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

शिवराय नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत बराटे, कार्यक्रमाचे संयोजक शांताई संस्थेचे अध्यक्ष बाप्पू कांबळे, संचालिका रश्मी शागिरल, सामाजिक कार्यकर्ते प्रताप मोहिते, प्रकाश ओव्हाळ, राजू गायकवाड उपस्थित होते. नवी खडकी शिवाजी पुतळा चौक येथे या उपक्रमाची मान्यवरांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या सुसज्ज अशा अत्याधुनिक नेत्र रुग्णवाहिकेत तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून यावेळी नागरिकांची मोफत नेत्र तपासणी तसेच नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यात आली. या तपासणीमध्ये ज्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया आवश्यक आहे त्यांना मोतीबिंदूची शस्त्रक्रिया मोफत करण्यात येईल. तसेच इतर आवश्यक नेत्र रुग्णांसाठी अल्प दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमासाठी एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाचे प्रकल्प समन्वयक दिनेश राऊळ व नेत्र तंत्रज्ञ पूजा चौधरी यांनी नागरिकांची तपासणी केली. येरवडा परिसरातील गरीब व गरजू नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, अल्पदरात चष्मे वाटप तसेच गरजू रुग्णांसाठी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया हा उपक्रम ठिकाणी राबवण्यात येणार असून जास्तीत जास्त गरजू नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शांताई संस्थेचे अध्यक्ष बापू कांबळे यांनी केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: