गणशोत्सव २०२१ – स्टार प्रवाहच्या कलाकारांचा जल्लोष

गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचच लाडकं दैवत. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आपण वर्षभर बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेले असतो. भक्तीमय वातावरणाने भारावून टाकणारे हे १० दिवस वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि नवचैतन्य देऊन जातात. बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. रंगीबेरंगी सजावटीच्या साहित्याने आणि आसमंत दरवळून टाकणाऱ्या पुजाविधीच्या सामग्रीने बाजारपेठा सजल्या आहेत.

बाप्पाच्या आगमनासाठी तुम्ही आम्ही उत्सुक असताना यात स्टार प्रवाहचा परिवार कसा बरं मागे राहिल. लाडक्या गणरायाचं स्वागत स्टार प्रवाहचे कलाकार अगदी जल्लोषात करणार आहेत. स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१ या गणपती विशेष कार्यक्रमात बाप्पाच्या स्वागतासाठी संपूर्ण स्टार प्रवाह परिवार एकत्र येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाची रंगत द्विगुणीत होणार यात शंका नाही. ढोल-ताश्यांच्या गजरात बाप्पाचं स्वागत करण्यापासून ते अगदी आरती, गणेशजन्माची कथा, बाप्पाची गाणी असं सगळं अगदी जल्लोषात पार पडणार आहे. सणासुदीचे दिवस म्हण्टले तर आपले पारंपरिक खेळही ओघाने आलेच.  स्टार प्रवाहच्या मालिकांमधल्या तुमच्या आवडीच्या सासु-सुनांच्या जोड्या मंगळागौरीचे खास खेळ देखिल खेळणार आहेत. त्यामुळे मनोरंजनाने परिपूर्ण असा गणपती विशेष कार्यक्रम असेल. स्टार प्रवाह परिवाराचा गणपती असल्यामुळे या परिवाराचा अतिशय महत्त्वाचा भाग असणाऱ्या प्रेक्षकांनाही या कार्यक्रमाचं खास निमंत्रण आहे. रविवार १२ सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजल्यापासून प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घरबसल्या घेता येईल.

Leave a Reply

%d bloggers like this: