सांगितीक मैफिलीत प्रथमचं १६ गायक एका रंगमंचावर

पुणे : एका आगळ्यावेगळ्या सांगितीक मैफिलीत पुण्यात प्रथमच १६ गायिका एकाच रंगमंचावर द्वंद्व गीत गाताना पहाण्याचा दुर्मीळ योग आला. ज्ञानश्री फाउंडेशनच्या वतीने एस. एम. जोशी सभागृह या ठिकाणी सामाजिक आणि सांगितीक सोहळ्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या प्रसंगी ज्ञानश्री फाउंडेशन चे जोह्र्भाई चुनावला, आनंदीवास्तूचे आनंद पिंपळकर, लिज्जत पापड समुहाचे संजय कोते, भारती हॉस्पीटलचे प्रमुख शल्यचिकित्सक डॉ. खरात, आर. के. फाउंडेशनच्या संचालिका भाग्यश्री साळुंखे, सम्यक मेंटल केअरचे डॉ. ज्ञानराज चौधरी व डॉ.रूपाली चौधरी हे मान्यवर उपस्थित होते.

या मैफिलीत विविध पठडीतील गीते सादर करण्यात आली. गायक हिम्मतकुमार पंडया आणि राजेंद्र दीक्षित यांनी साथ दिली. सम्यक हॉस्पीटल तसेच आनंदी वास्तू तर्फे ज्ञानश्री फाउंडेशनला त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण करत असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि शैक्षणिक कामासाठी निधी देण्यात आला. या कार्यक्रमातून मिळालेला निधी लहान मुलांच्या आरोग्य व शिक्षणासाठी तसेच गरजवंतापर्यंत वापरला जाणार असल्याचे अध्यक्ष जोहरभाई चुनावाला यांनी स्पष्ट केले. ज्ञानश्री फाउंडेशनचे अध्यक्ष जोहरभाई चुनावाला, उपाध्यक्ष अमर काळे, सचिव राजेंद्र दीक्षित, उपसचिव अजय करंदीकर, खजिनदार यशवंत भुजबळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. तर सूत्रसंचालन प्राजक्ता जोगळेकर व डॉ.रुपाली चौधरी यांनी केले. ज्ञानश्री फाउंडेशनचे उपाध्यक्ष अमर काळे यांनी आपल्या उत्कृष्ट संभाषणातून सामाजिक कार्याच्या संदेशाची जनजागृती केली.

Leave a Reply

%d bloggers like this: